शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
4
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
5
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
6
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
7
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
8
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
9
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
10
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
11
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
12
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
13
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
14
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
15
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
16
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
17
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
18
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
19
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
20
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन

सांगली - जूनमधील पाऊस ३२ मिलिमीटरने घटला : तीन वर्षातील सर्वात नीचांकी प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 00:05 IST

यंदाच्या मान्सूनने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रदीर्घ काळ प्रतीक्षेत ठेवल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे.

ठळक मुद्देहवामानाच्या लहरीपणाने चिंतेचे ढग दाटले

अविनाश कोळी ।सांगली : यंदाच्या मान्सूनने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रदीर्घ काळ प्रतीक्षेत ठेवल्याने शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे. दुष्काळी तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्यात गतवर्षाच्या तुलनेत जून महिन्यातील पावसाचे प्रमाण ३२ मिलिमीटरने घटले असून तीन वर्षातील नीचांकी पावसाची नोंद झाली आहे.पावसाअभावी यंदा शेतकरी अडचणीत आला आहे.

मान्सून विलंबाने आल्यानंतरही त्याचे प्रमाण समाधानकारक नाही. जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी, खानापूर, जत, कवठेमहांकाळ या भागात मान्सूनपूर्व पाऊस पडला असला तरी, तो समाधानकारक नाही. त्यामुळे दुष्काळी चटके अजूनही सोसावे लागत आहेत. दुष्काळी भागाला नेहमी मान्सूनपूर्व किंवा परतीचा पाऊस तारणारा ठरत असला तरी, यंदा मान्सूनपूर्व पावसानेही निराशा केली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील पेरण्यांचा खोळंबा झाल्याचे चित्र आहे.

जूनच्या दुसºया पंधरवड्यातच मान्सून दाखल झाला असून, अद्याप पावसाचा म्हणावा तसा जोर नाही. गेल्या तीन वर्षातील जून महिन्यातील पावसाची सरासरी पाहिली, तर यंदा तुलनेने सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी, तसेच जिल्ह्यातील नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यातील पावसावरच आता शेतकºयांची आशा जिवंत आहे. गेल्या काही वर्षांचा अभ्यास केला, तर या प्रत्येक वर्षी जुलैमधील पावसानेच जिल्ह्याला तारले आहे. या महिन्यात होणाºया पावसामुळे धरणे, तलाव व अन्य जलस्रोत भरले जातात. आॅगस्टमधील पावसानेही अनेकदा आधार दिला आहे, मात्र वारंवार हवामानाच्या लहरीपणाचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसत आहे.आटपाडी, तासगाव वगळता अन्यत्र घटसांगली जिल्ह्याच्या तालुकानिहाय पावसाच्या शासकीय आकडेवारीनुसार, केवळ आटपाडी व तासगाव तालुक्यात गतवर्षापेक्षा जास्त पावसाची नोंद दिसून येते. २७ जून २0१८ रोजी आटपाडीतील एकूण पाऊस ३५ मि.मी. नोंदला गेला होता. त्याच तारखेला यावर्षी मात्र ७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तासगावमध्ये गतवर्षी ३५.५ मि.मी.ची नोंद होती, यंदा ती १0४.५ मि.मी. झाली आहे.आगामी आठवडा कमी पावसाचाभारतीय हवामान खात्याने गुरुवारी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आगामी आठवडाही कमी पावसाचाच राहणार आहे. ३ जुलैपर्यंत वातावरणात फारसा फरक दिसणार नाही, असे हवामान खात्याने म्हटले आहे.तीन वर्षातील सरासरी पाऊस(२७ जूनअखेरचा मि.मी.)तालुका २0१९ २0१८ २0१७मिरज ७१.२ ८२ २९जत ११४.0५ ११५ २0४आटपाडी ७३ ३५ १४0क. महांकाळ ६७.२ ७0.७ १३६.४पलूस २८ ८३ २३कडेगाव ८९ १३९.३0 ५९विटा ५७ १९३ ७५तासगाव १0४.0५ ३५.५ ४६.५शिराळा ८६ २१९ १0३तीन वर्षात सर्वाधिक पाऊस २0१८ मधील जूनमध्ये नोंदला गेला होता.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस