शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 11:09 PM

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली असून सांगली, मिरजेसह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाने मंगळवारी दिवसभर मुक्काम ठोकला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. जून आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने अपेक्षाभंग केल्यामुळे शेतकरी व नागरिकांच्या डोक्यावर चिंतेचे ढग दाटले होते. ही चिंता दूर करीत पावसाने मंगळवारी मुहूर्त साधत दिवसभर मुक्काम ठोकला. सांगली, मिरज परिसरात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. पावसाचा जोर नसला तरी, तो कायम असल्याने संपूर्ण शहराला या हलक्या सरींनी चिंब भिजविले. शहराच्या सखल भागात पाणी साचले असून गुंठेवारी भागात पुन्हा दलदल निर्माण झाली आहे. जिल्ह्यातही रिमझिम चालू असून शेतीच्या कामांना गती आली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार २२ जुलैपर्यंत जिल्ह्यात पावसाची स्थिती अशीच राहणार आहे. तासगाव तालुक्यात पावसाचे आगमनतासगाव : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात सोमवारी दिवसभर मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या पावसाने शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला नसला तरी, शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या अपेक्षेत आहे. सोमवारी सकाळपासूनच तासगाव शहरासह तालुक्यातील लोढे, बस्तवडे, आरवडे, वायफळे, डोंगरसोनी, सावळज, यमगरवाडी, बिरणवाड़ी, अंजनी, वडगाव, लोकरेवाडी, सावर्डे, मणेराजुरी, खुजगाव, चिंचणी, विसापूर, हातनूर, पेड, येळावी, कवठेएकंद, बोरगाव, योगेवाड़ी, उपळावी यासह तालुक्याच्या सर्व भागात पावसाने हजेरी लावली. द्राक्षबागांना हा पाऊस पोषक ठरून बागांच्या काड्या लवकर तयार होण्यासाठी मदत करणारा आहे. खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्या सुरु होण्यासाठी मात्र शेतकरी अजून दमदार पावसाच्या अपेक्षेत आहेत. पलूस परिसरात पावसाची हजेरीपलूस : पलूस तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप चालू झाली आहे. त्यामुळे शेतकरी आनंदात असून मंगळवारपासून टोकणीची कामे सुरू झाली आहेत. गेल्या दीड महिन्यापासून चातकासारखी पावसाची वाट पाहणारा बळीराजा या पावसामुळे सुखावला असून आता पेरणी व टोकणीच्या कामाला गती आली आहे. सध्या तालुक्यात फक्त पस्तीस टक्के पेरणी झाली आहे. मंगळवारपासून पावसाने जोर धरला असून शेतकरी पेरणीच्या व टोकणीच्या तयारीत आहेत. काही ठिकाणी ऊस लावण चालू झाली आहे. मंगळवारी दिवसभर संततधार सुरूच होती.ंमेणी ओढ्यावरील पूल पाण्याखालीकोकरूड : गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असून या पाण्यामुळे मेणी ओढ्यातील पूल पाण्याखाली गेल्याने चार वाड्यांचा संपर्क तुटला आहे. शेतीचे बांध फुटल्याने नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. सोमवारी व मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने संपूर्ण परिसरातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. येळापूर, गवळेवाडी मार्गावरील मेणी ओढ्यावर असणारा समतानगर येथील पूल पाण्याखाली गेल्याने हाप्पेवाडी, कांबळेवाडी, दीपकवाडी, समतानगर येथील वाडीचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी सततच्या पावसामुळे शेतातील बांध फुटून माती पिकासह वाहून गेली आहे. कडेगाव तालुक्यात पावसाची रिमझिमकडेगाव : तालुक्यात सोमवारी रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरु झाली आहे. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असले तरी, शेतकरी अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कडेगाव तालुक्यात कडेगाव, कडेपूर, शाळगाव, वांगी, चिंचणी या सर्व परिसरात पावसाची रिमझिम सुरु झाल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. पावसाळ्यातील सुरूवातीच्या दीड महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने चिंतेत असलेले शेतकरी आता काहीसे सुखावले आहेत. यावर्षी एप्रिल, मे महिन्यात वळीवही म्हणावा तसा झाला नव्हता. त्यानंतर मान्सूनचीही सुरूवात धीमीच झाली. तरीही धाडसाने शेतकाऱ्यांनी उशिरा पेरण्यांची कामे उरकून घेतली. पण पावसाने निराशा केली होती. आता रिमझिम झुरू झाल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे.चांदोलीत २०.०६ टीएमसी पाणीसाठावारणावती : चांदोली पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे चांदोली धरणातील पाणीसाठा गेल्या २४ तासात एक टीएमसीने वाढला आहे. धरणातील पाणीसाठा २०.०६ टीएमसी झाला आहे. शिराळा पश्चिम विभागात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने हवेत गारठा निर्माण झाला आहे. पाणलोट क्षेत्रातून चांदोली धरणात येणाऱ्या प्रतिसेकंद ११ हजार ४५६ क्युसेक पाण्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. गेल्या २४ तासात ५३ मिलिमीटर पावसासह ९४५ मिलिमीटर पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापकावर झाली आहे. धरणाची पातळी ६१०.४० मीटर झाली आहे. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.