शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात आणि भ्रूण हत्येप्रकरणी सांगली पोलिसांचे कोल्हापूरात छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 13:48 IST

सांगली येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटमधील बेकायदा गर्भपात आणि भ्रूणांच्या हत्येप्रकरणी सांगली पोलिसांनी शुक्रवारी कोल्हापूरात छापे टाकले.

ठळक मुद्देगर्भपात आणि भ्रूण हत्येप्रकरणी सांगली पोलिसांचे कोल्हापूरात छापेसंशयितांचा शोध : नांदणी, जांभळीत भ्रूणांचे दफन

सांगली : येथील गणेशनगरमधील चौगुले मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटमधील बेकायदा गर्भपात आणि भ्रूणांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील डॉक्टर व त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्या शोधासाठी सांगलीपोलिसांनी शुक्रवारी कोल्हापूरात छापे टाकले. नांदणी, जांभळी (ता. शिरोळ) येथे भ्रूणांचे दफन केल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने खोदकाम करुन भ्रूणांचे अवशेष शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.गेल्या आठवड्यात गर्भपात व भ्रूण हत्येचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी डॉ. रुपाली चौगुले, तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले या दोघांना अटक केली आहे. डॉ. स्वप्नील जमदाडे अजूनही फरारी आहे. अटकेतील डॉक्टर चौगुले दाम्पत्याची कसून चौकशी केली जात आहे.

गर्भपात केलेल्या महिला व हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यांच्या चौकशीतून कोल्हापूर व परिसरातील डॉक्टर आणि त्यांच्या रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांचा यामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या शोधासाठी गुरुवारी रात्री सांगली पोलिसांचे पथक कोल्हापूरला रवाना झाले आहे.

शुक्रवारी दिवसभर कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकले. यामध्ये दोन संशयित हाताला लागले आहेत. पण तपासाच्याद्दष्टिने पोलिसांनी गोपनियता बाळगली असल्याने त्यांची नावे समजू शकली नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महिलांनी येथे गर्भपात केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे नऊ गर्भपाताचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.खोतकाम सुरुगर्भपात करुन हत्या केलेल्या भ्रुणांचे नांदणी, जांभळीसह शिरोळ तालुक्यातील आणखी काही गावात दफन केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. पोलिसांनी ग्रामस्थांच्यामदतीने दफन केलेल्या जागेवर खोदकाम सुरु ठेवले आहे. भ्रूणांचे अवशेष हाती लागल्यास डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध भक्कम पुराव मिळू शकतो. त्याद्दष्टिने तपासाला दिशा देण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगलीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर