शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

सांगलीतील वारणावती वसाहतीमध्ये अजगराचे पुन्हा दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 15:27 IST

सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या दिले ताब्यात 

विकास शहाशिराळा : वारणावती (ता. शिराळा) येथील वसाहतीमध्ये आज रात्री साडेआठच्या सुमारास भल्या मोठ्या अजगराचे दर्शन झाले. परिसरातील काही युवकांना अजगर निदर्शनास येताच त्यांनी सर्पमित्र तसेच वन अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर तब्बल अडीच ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर या अजगराला पकडण्यात यश आले. रोहित मेंगाणे, मनोज मेलकरी, सुरज कोळी, गणेश कोळी, अशपाक गुड्डापुरे या युवकांना रात्रीच्या वेळी अजगर निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ सर्पमित्र संग्राम कुंभार यांना याबाबत कळवले. माहिती मिळताच सर्पमित्र कुंभार घटनास्थळी दाखल होते त्यांनी वन्यजीव अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. वन्यजीवचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तब्बल अडीच ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर या अजगराला पकडण्यात यश आले. रात्रीची वेळ त्यात वसाहतीत अंधाराचे साम्राज्य असल्यामुळे त्याला पकडण्यासाठी वन्यजीव कर्मचारी तसेच सर्पमित्रांना कसरत करावी लागली.साधारण ११ फूट लांब व ६० ते ७० किलो वजनाचा हा भला मोठा अजगर आढळल्याने भीतीचे वातावरण आहे. गेल्या महिनाभरापूर्वी करमणूक केंद्राजवळ भल्यामोठ्या अजगराचे दर्शन झाले होतं. त्यामुळे हे अजगर तोच आहे की दुसरा याबाबत मात्र स्पष्ट समजू शकले नाही. वन्यजींवच्या ताब्यात सध्या हा अजगर असून त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यासाठी रात्री उशिरा कर्मचारी रवाना झाले.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग