शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीसह पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर स्थानके आरडीएक्सने उडविण्याची धमकी

By संतोष भिसे | Updated: May 14, 2024 15:50 IST

बॉम्बशोध पथकाने सांगली व मिरज स्थानकांत कसून तपासणी केली

सांगली : रेल्वे स्थानकांत बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या अज्ञाताविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. स्फोटाच्या धमकीने सोमवारी रात्री जिल्हा पोलिस दलाची बरीच धावपळ झाली.रात्री सव्वाआठ वाजता शहर पोलिसांना स्फोटाच्या धमकीचा फोन आला. अज्ञाताने सांगितले की मी दहशतवादी आहे. माझ्यासोबत आणखी पाच व्यक्ती आहेत. त्या व्यक्ती मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथे पोहोचल्या आहेत. आरडीएक्सने या स्थानकांत स्फोट करणार आहेत. या धमकीची दखल घेत पोलिस अधिक्षक संदीप घुगे, अतिरिक्त अधिक्षक रितू खोकर यांच्यासह पोलिस पथके सांगली व मिरज स्थानकांत पोहोचली.जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना संदेश देऊन मुख्य रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली. संशयित वाहनांची झडती घेण्यात आली. रुग्णवाहिका, अग्नीशमन यंत्रणा, खासगी व सरकारी रुग्णालये यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.यादरम्यान, बॉम्बशोध पथकाने सांगली व मिरज स्थानकांत कसून तपासणी केली. त्यावेळी कोणतीही अनुचित बाब आढळली नाही. या मोहिमेत सांगली, मिरजेतील पोलिस अधिकारी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, दंगलविरोधी पथक, दहशतवादविरोधी पथक आदींनी सहभाग घेतला.दरम्यान, सांगली व मिरजेतील गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरिक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले की, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरPuneपुणेSolapurसोलापूरrailwayरेल्वे