शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-कोल्हापूर-पुणे फास्ट डेमू पॅसेंजर नव्या रेकसह धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 18:29 IST

साताऱ्यात बंद डेमू इंजिन लावून खेचून आणली

सांगली : सांगली, साताऱ्यातील हजारो प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली पुणे-कोल्हापूर-पुणे ही फास्ट डेमू पॅसेंजर आता नव्या रेकसह धावणार आहे. सध्याची गाडी सतत बंद पडत असल्याने प्रवाशांनी सातत्याने आंदोलने केली होती. त्याची दखल घेत पुणे विभागाने १० नव्या रेकसह नवी पॅसेंजर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आठवडाभरात नवी गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.सध्याची डेमू पॅसेंजर प्रवासादरम्यान जागोजागी बंद पडत होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप होता. प्रवाशांनी तसेच प्रवासी संघटनांनी या गाडीविरुद्ध प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. अनेकदा आंदोलनेही केली होती. त्याची दखल घेत मध्य रेल्वेने या पॅसेंजरचे सर्व १० डबे बदलून नवा रेक देण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, प्रवाशांना विनाखोळंबा धावणारी नवी डेमू गाडी मिळणार आहे.कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर मार्गावर मध्य रेल्वेकडून डेमू गाड्या चालविल्या जातात. त्यांपैकी निळा आणि गुलाबी रंग असलेली डेमू सातत्याने बंद पडण्याच्या तक्रारी होत्या. अनेकदा ती साताऱ्यात किंवा मिरज-कोल्हापूरदरम्यान बंद पडायची.

साताऱ्यात बंद डेमू इंजिन लावून खेचून आणलीचारच दिवसांपूर्वी साताऱ्यात ती बंद पडल्याने इंजिन पाठवून पुढे कोल्हापूरपर्यंत ओढून आणावी लागली होती. या गाडीतून सातारा, सांगली, मिरजेतून दररोज हजारो नोकरदार, विद्यार्थी प्रवास करतात. गांधीनगरला कामासाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. डेमू बंद पडत असल्याने या सर्वांचा खोळंबा होत होता. गेल्या दोन महिन्यांत तीनवेळा ती प्रवासादरम्यान बंद पडली होती. तत्काळ दुरुस्ती होत नसल्याने प्रवाशांना एका जागी दोन-दोन तास ताटकळावे लागत होते. ही गाडी बंद पडत असल्याने अन्य गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होत होता, याची दखल मध्य रेल्वेने घेतली.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेPuneपुणेpassengerप्रवासी