आष्टा ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन यंत्र प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST2021-06-28T04:18:46+5:302021-06-28T04:18:46+5:30

आष्टा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था, सांगोला आणि हुमानेटिरिन अ‍ॅन्ड इंटरनॅशनल, दिल्ली या संस्थांच्या वतीने व ...

Provide oxygen machine to Ashta Rural Hospital | आष्टा ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन यंत्र प्रदान

आष्टा ग्रामीण रुग्णालयाला ऑक्सिजन यंत्र प्रदान

आष्टा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेती विकास संशोधन संस्था, सांगोला आणि हुमानेटिरिन अ‍ॅन्ड इंटरनॅशनल, दिल्ली या संस्थांच्या वतीने व आष्टा राष्ट्र सेवा दल शाखा तसेच जायंट्स ग्रुप आष्टा यांच्या माध्यमातून आज आष्टा ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटरला दहा लिटर क्षमतेचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्रदान करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष निगडी यांनी त्यांचा स्वीकार केला. यावेळी जायंट्स ग्रुप आष्टाचे अध्यक्ष समीर गायकवाड, राष्ट्र सेवा दलचे राज्य संघटक सदाशिव मगदुम, सांगली जिल्हा अध्यक्ष रामलिंग तोडकर, पूर्णवेळ कार्यकर्ते किरण कांबळे, कुंडले यांच्याबरोबरच जायंट्स ग्रुप आष्टाचे सचिव प्रा. सूर्यकांत जुगदार, सहसचिव बाबासाहेब सिद्ध, उपाध्यक्ष प्रा. विलासराव पाटील, संचालक प्रा. डी. एम. सोकाशी, राष्ट्र सेवा दल आष्टाचे कार्यकर्ते महेश मोरे, नितीन मोरे, सिराज मुजावर, श्रेयश शिराळकर, सोमनाथ माळी, गुलाब सय्यद, आष्टा ग्रामीण रुग्णालयाच्या इन्चार्ज सिस्टर्स सुलताना जमादार उपस्थित होते.

समीर गायकवाड म्हणाले, कोरोनाच्या काळात जायंट्स ग्रुप आष्टाने आष्टा व परिसरातील रुग्णांना सुविधा निर्माण व्हाव्यात यादृष्टीने अनेक उपक्रम राबवले आहेत. त्याचबरोबर गरजेनुसार आष्टा ग्रामीण रुग्णालय कोविड सेंटरला अनेक सुविधा निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

Web Title: Provide oxygen machine to Ashta Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.