शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
3
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
4
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
5
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
6
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
7
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
8
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
9
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
10
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
11
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
12
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
13
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
14
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
15
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
16
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
17
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
18
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
19
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
20
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल

महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात कडेगावात निषेध मोर्चा, पाणी संघर्ष समिती व सर्वपक्षीय संघटना आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 19:25 IST

कडेगाव : वीज दरवाढ कमी करावी,शेतकर्‍यांना  अखंड आठ तास वीज पुरवठा करावा,धोकादायक तारा, पोल व  डी पी दुरुस्ती करावे ...

कडेगाव : वीज दरवाढ कमी करावी,शेतकर्‍यांना  अखंड आठ तास वीज पुरवठा करावा,धोकादायक तारा, पोल व  डी पी दुरुस्ती करावे ,सतत होणारा विजेचा खेळखंडोबा थांबवावा आदी मागण्यासाठी कडेगाव शहरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयावर  सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पाणी संघर्ष चळवळ समिती व सर्व पक्षीय संघटनांच्या  कार्यकर्त्यांनी तसेच शेतकऱ्यांनी हल्लाबोल आंदोलन करून निषेध मोर्चा काढला. यावेळी अनोलकांनी हलगी वाजवत तसेच महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विजेच्या समस्याबाबत व प्रलंबित मागण्यासाठी बुधवार ( दि 10 ) रोजी सकाळी 10 वा च्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून संतप्त शेतकऱ्यांनी मोर्चास सुरुवात केली.यावेळी शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा शहरातून थेट महावितरणच्या मुख्य कार्यालयावर धडकला.शेतीला व घरगुती वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे.यामुळे शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.पाणी असून ही वीज अभावी पिके वाळून जात आहेत.तर जुलमी वीज दर वाढ कमी करावी. व विज बिल अभावी कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडू नये. शेतात लोंबकळत असलेल्या विजेच्या तारांमुळे राज्यात अनेक ठिकाणी जीवित हानी झाली आहे.त्यामुळे लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा सुस्थितीत जोडव्यात.शेती पंपा करीता  नवीन वीज जोडणी कोणताही भ्रष्टाचार न करता जोडावी.यासह आदी मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी करण्यात आली.अन्यथा 9 जुन ला आणखी तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते देशमुख यांनी दिला.यावेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्या मार्गदरशनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळो विजय शिंदे, संतोष डांगे, विजय गायकवाड, दीपक न्यायणीत, शशिकांत रासकर, मनोजकुमार मिसळ, सिद्दिक पठाण, प्रकाश गायकवाड, वसंत इनामदार, मोहन जाधव, जयवंतराव पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.अधिकाऱ्यांना घेराव महावितरण कार्यालयावर  मोर्चा आल्यानंतर महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शशिकांत पाटील यांना आंदोलकांनी घेराव घातला. विजेच्या समस्यासह अन्य मागण्यांबाबत विचारणा केली.यावेळी सदर मागण्याबाबत वरिष्ठना कळवण्यात आले आहे.तर तालुक्यातील व शहरातील वीज समस्या सोडवल्या जातील असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीelectricityवीजmahavitaranमहावितरण