शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘वक्फ’चे गैरसमज दूर करण्यासाठी सांगलीत सर्वधर्मीय परिषद घेणार, पुरोगामी संघटनांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:10 IST

..मग बाबरी वक्फमध्ये का नाही?

सांगली : वक्फ कायद्याच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम केंद्र शासन करत आहे. कायद्याबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी सांगलीत सर्वधर्मीय परिषद घेण्याचा निर्णय पुरोगामी संघटनांच्या बैठकीत झाला. परिषदेसाठी पाहुणे व दिवस नंतर निश्चित केला जाणार आहे.सांगलीत कष्टकऱ्यांची दौलत सभागृहात रविवारी बैठक झाली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भूमिका मांडल्या. धनाजी गुरव म्हणाले, वक्फ कायद्याच्या माध्यमातून हिंदू-मुस्लीम धर्मीयांत तेढ निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. वक्फ या संकल्पनेचा चुकीची अर्थ लावून मुस्लिमांच्या जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकतर्फी प्रचारामुळे हिंदू-मुस्लिमांची मने कलुषित होत आहेत. याला वेळीच आवर घातला नाही, तर भविष्यात मोठे सामाजिक संकट निर्माण होईल. ॲड. अजित सूर्यवंशी म्हणाले, वक्फच्या जमिनी व अन्य स्थावर संपत्ती लूटमार करून किंवा जबरदस्तीने घेतलेल्या नाहीत. मुस्लीम धर्मीयांनी धार्मिक श्रद्धेपोटी त्या स्वत:हून दिल्या आहेत; पण याचा गैरअर्थ काढून त्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न दिसत आहे. पुणे येथील रिजवान शेख म्हणाले, वक्फमध्ये मुस्लीम धर्मीयांची स्थावर संपत्ती आहे, तशीच हिंदूंमध्ये त्यांच्या देवस्थानांचीही संपत्ती आहे; पण ही माहिती न देता चुकीचा प्रचार केला जात आहे.प्रा. तोहिद मुजावर, जसबीर कौर खंगुरा, मुफ्ती जुबेर बेपारी, गॅब्रिएल तिवडे यांनीही यावेळी भूमिका मांडली. वक्फविषयीचे सर्व गैरसमज आणि चुकीचा प्रचार खोडून काढण्यासाठी सांगलीत सर्वधर्मीय परिषद घेण्याचा निर्णय झाला. बैठकीला विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष विकास मगदूम, ज्योती अदाटे, सचिन करगणे, महाबीर उमर फारुख, इरफान अली, राजू कांबळे, संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब पाटील, विशाल कोठावळे, दत्तात्रय बामणे, अशफाक शेख आदी उपस्थित होते.

अन्य अल्पसंख्याकांवरही संकटबैठकीत भूमिका मांडण्यात आली की, सध्या मुस्लीम धर्मीयांपुरते असणारे हे संकट भविष्यात जैन, शीख आदी अल्पसंख्याकांवरही येण्याची भीती आहे. त्यामुळे आताच त्याचा सामूहिक मुकाबला करायला हवा. सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात सर्वधर्मीयांनी एकजूट करायला हवी.

..मग बाबरी वक्फमध्ये का नाही?दिसेल ती जागा ‘वक्फ’चीच अशी भूमिका असती, तर वक्फ समितीने बाबरी मस्जिदीवरही दावा सांगितला असता; पण ही मस्जिद वक्फमध्ये नव्हती, याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले.

टॅग्स :Sangliसांगलीwaqf board amendment billवक्फ बोर्डMuslimमुस्लीम