शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

संकेतने तर बोहनी केली!, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले गौरवोद्गार; राष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्यांशी साधला संवाद

By संतोष भिसे | Published: August 16, 2022 6:04 PM

मोदींनी संकेतच्या जखमेची व शस्त्रक्रियेचीही माहिती घेतली.

सांगली : बर्मिंगहॅममध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत संकेत सरगरने जणू बोहनीच केली, त्यामुळे देशाला भरभरुन पदके मिळू शकली असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. संकतने जखमेकडे दुर्लक्ष करु नये असा सल्लाही दिला.राष्ट्रकुल स्पर्धेतील स्पर्धेतील पदक विजेत्यांशी मोदी यांनी संवाद साधला. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. पदकांची लयलूट अशीच सुरु ठेवाल अशी अपेक्षा व्यक्त केली. या संवादादरम्यान, त्यांनी सांगलीच्या संकेत सरगरचा विशेष उल्लेख केला. राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये ५५ किलो वजनी गटात संकेतने रौप्य पदक पटकाविले होते. वजन उचलताना त्याच्या उजव्या हाताचा स्नायू दुखावल्याने सुवर्णपदक थोडक्यात हुकले. त्याच्यावर इंग्लंडमध्येच शस्त्रक्रिया करण्यात आली.मोदींनी संकेतच्या जखमेची व शस्त्रक्रियेचीही माहिती घेतलीतथापि, त्याने मिळविलेले रौप्य पदक भारतासाठी पदकांचे खाते उघडणारे ठरले. खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत ६१ पदके मिळवून भारताला अग्रेसर ठेवले. याचा गौरवोल्लेख मोदींनी केला. ते म्हणाले, एखाद्या व्यावसायिकाची बोहनी चांगली झाली, तर त्याचा संपूर्ण दिवस, महिना आणि वर्षही व्यापारात चांगले जाते असे म्हंटले जाते. तशीच चांगली बोहनी संकेतने भारतासाठी केली. त्यामुळे देशाला भरपूर पदके मिळाली. मोदींनी संकेतच्या जखमेची व शस्त्रक्रियेचीही माहिती घेतली. इंग्लंडमध्ये शस्त्रक्रिया झाल्यावर पुढील उपचार भारतात होत आहेत, त्यामध्ये काही फरक वाटतो का? अशी विचारणा केली. संकेतने सांगितले की, दोन्ही देशांतील डॉक्टर्स कॉन्फरन्सद्वारे संपर्कात आहेत. परस्परांशी चर्चेतून उपचार करत आहेत.खेळाडूसाठी त्याचे शरीर ही सर्वात मौल्यवान चीजमोदी म्हणाले, खेळाडूसाठी त्याचे शरीर ही सर्वात मौल्यवान चीज असते. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांमध्ये हयगय होता कामा नये. यासंदर्भात मी अधिकाऱ्यांशी बोलेन. प्रकृतीकडे दुर्लक्ष होता कामा नये. राष्ट्रकुलमध्ये चांगली बोहनी केल्याबद्दल काय वाटते? त्यावर संकेतने सुवर्णपदक हुकल्याची खंत व्यक्त केली. स्पर्धास्थळी तिरंगा फडकाविण्याच्यी आणि भारताचे राष्ट्रगीत ऐकण्याची इच्छा होती, पण जखमी झाल्याने देशासाठी सुवर्णपदक मिळवू शकलो नाही असे तो म्हणाला.प्रकृतीकडे दुर्लक्ष नको : मोदीमोदी म्हणाले की, प्रत्येक खेळाडूला स्वत:च्या शरीराबद्दल अभिमान असतो, तो असायलाच हवा. पण जखम होते, तेव्हा दुर्लक्ष करता कामा नये. प्रकृती कितीही दणकट असली, किंवा सराव चांगला असला तरी दुर्लक्ष होता कामा नये.

टॅग्स :SangliसांगलीCommonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाNarendra Modiनरेंद्र मोदी