शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

बांधकाम झाले स्वस्त, पण गृहकर्ज महागले; सांगा घर बांधायचे कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 14:23 IST

एरवी पावसाळ्यात २५ टक्क्यांनी घटणारी बांधकाम साहित्याची मागणी यंदा ३५ टक्क्यांनी कमी झाली

अविनाश कोळीसांगली : बांधकाम साहित्याचे दर उतरल्यामुळे घराच्या स्वप्नांचे इमले मनात बांधणाऱ्यांना दुसरीकडे गृहकर्जाच्या दरवाढीने हादरविले आहे. एरवी पावसाळ्यात २५ टक्क्यांनी घटणारी बांधकाम साहित्याची मागणी यंदा ३५ टक्क्यांनी कमी झाली आहे. अनेकांनी त्यामुळे घरासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे.सिमेंट, स्टील व अन्य बांधकाम साहित्याच्या दरात वर्षाच्या सुरुवातीला मोठी वाढ झाल्यानंतर अनेकांच्या घराच्या स्वप्नांना तडे गेले होते. साहित्याचे दर कमी होण्याची लोकांना प्रतीक्षा होती. आता दर उतरत असले तरीही त्यांना हे स्वप्न साकारता येत नसल्याचे चित्र आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर गेल्या काही महिन्यात गृहकर्जासह सर्वच प्रकारची कर्जे महाग झाली आहेत. त्यामुळे कर्जाचा हप्ता वाढणार आहे.बांधकामाचा खर्च जितका कमी झाला आहे, त्यापेक्षा अधिक खर्चाचा भार गृहकर्जातून वाढणार असल्याने अनेकांचा घरांचा बेत लांबणीवर गेला आहे. प्रत्येक पावसाळ्यात बांधकामांचे प्रमाण घटत असते. त्यामुळे साहित्याच्या मागणीत सुमारे २० ते २५ टक्के घट होत असते, मात्र यंदा ही घट ३५ टक्क्यांपर्यंत नोंदली गेली.

बांधकाम साहित्य झाले स्वस्त

रशिया व युक्रेन यांच्यातील युद्धामुळे पाच महिन्यांपूर्वी प्रतिटन ९० हजार रुपयांवर गेलेले माईल्ड स्टील आता ६३ हजार रुपयांपर्यंत खाली आले आहे. स्टेनलेस स्टीलचा दरही प्रतिकिलो ३२५ रुपयांवरुन २८० रुपयांपर्यंत खाली आला आहे. सिमेंटचा भाव दोन महिन्यात २० ते ४० रुपयांनी उतरला आहे. क्रश सँडचा भाव महिन्यात प्रतिब्रास ५०० ते १ हजार रुपयांनी घटला आहे.

गृहकर्ज दराची चिंतामे व जूनमध्ये रेपो दरात एकूण ०.९ टक्के वाढ झाली. त्यामुळे सर्व प्रकारची कर्जे तितक्या प्रमाणात वाढली. जे कर्ज ६.४० टक्के व्याजदराने मिळत होते ते आता ७.५० टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे कर्जाचा हप्ता वाढला आहे.

स्टीलच्या मागणीत यंदा नेहमीपेक्षा अधिक घट नोंदली आहे. दर जेव्हा जास्त होते तेव्हाही उत्पादकांना मागणीतील घट अनुभवास आला. - संजय खांबे, स्टील उद्योजक 

ज्यांनी जुन्या व्याज दराने गृहकर्ज घेतले आहे, त्यांना वाढलेल्या दराचा फटका बसणार आहे. अद्याप गृहकर्ज आवाक्यात असले, तरी यापुढे थोडे जरी दर वाढले तर गृहप्रकल्पांना फटका बसेल. - दीपक सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष, क्रेडाई

टॅग्स :SangliसांगलीHomeसुंदर गृहनियोजन