सांगलीत हळदीला १७ हजारांचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 18:20 IST2020-02-18T18:20:11+5:302020-02-18T18:20:56+5:30
सांगली मार्केट यार्डात नवीन हळद विक्री सौद्यादिवशी सात ते आठ हजार क्विंटल हळदीची आवक झाली होती. हळदीला क्विंटलला पाच हजार ते १७ हजारांपर्यंत दर मिळाला आहे.

सांगलीत हळदीला १७ हजारांचा भाव
ठळक मुद्देसांगलीत हळदीला १७ हजारांचा भावसात ते आठ हजार क्विंटल हळदीची आवक
सांगली : सांगलीमार्केट यार्डात नवीन हळद विक्री सौद्यादिवशी सात ते आठ हजार क्विंटल हळदीची आवक झाली होती. हळदीला क्विंटलला पाच हजार ते १७ हजारांपर्यंत दर मिळाला आहे.
आष्टा, मिरज, कोल्हापूर, कर्नाटक सीमा भागातील शेतकरी मोठ्या संख्येने हळद घेऊन आले होते.
सांगली मार्केट यार्डामध्ये नियमितच हळदीची उलाढाल होते; पण नवीन हळदीची आवक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच नेहमी होते.
मार्केट यार्डात सात ते आठ हजार क्विंटल हळदीची आवक झाली होती. हलक्या प्रतीच्या हळदीला पाच हजार, चांगल्या दर्जाच्या हळदीला १७ हजारांपर्यंतचा दर मिळाला आहे, अशी माहिती हळद व्यापारी मनोहर सारडा यांनी दिली.