शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मिरज सिव्हिलमधील खाटांवर चक्क कुत्र्यांचा मुक्काम, रोहित पवार यांची आरोग्यमंत्र्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 12:25 IST

आरोग्यमंत्र्यांना जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार नक्कीच मिळेल

मिरज : मिरजेतील शासकीय रुग्णालयात खाटांवर चक्क कुत्रे झोपा काढत असल्याचे छायाचित्र आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमांवर शेअर करीत आरोग्यमंत्र्यांवर टीका केली आहे. दीड महिन्यापूर्वी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील हा प्रकार समोर आल्यानंतर याची चाैकशी करून तेथे रखवालदार नियुक्त केल्याचे ‘सिव्हिल’चे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. रूपेश शिंदे यांनी सांगितले.आमदार रोहित पवार यांनी शेअर केलेल्या छायाचित्रात मिरज शासकीय रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी ठेवलेल्या खाटांवर चक्क तीन कुत्रे झोपलेले दिसत आहेत. कार्यकर्त्यांनी हे फोटो पाठवले असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. दीड महिन्यापूर्वी मिरजेतील सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर पाठविलेले हे छायाचित्र रोहित पवार यांनी आता आपल्या अकाऊंटवरून शेअर केले आहे.

मिरज शासकीय रुग्णालयात माणसांसोबत पाळीव प्राण्यांचाही उपचार केला जात असावा. या अभिनव योजनेची जाहिरात देण्यास आरोग्यमंत्री विसरले आहेत. यासाठी आरोग्यमंत्र्यांना जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार नक्कीच मिळेल, अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली आहे.मिरज शासकीय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात सीटी स्कॅन तपासणी विभागासमोर रुग्णांना विश्रांतीसाठी खाटा ठेवण्यात आल्या आहेत. बाह्यरुग्ण विभाग बंद झाल्यानंतर येथे कोण नसल्याने पहाटेच्या वेळी भटकी कुत्री येत असतात. त्याची व्हिडीओ क्लिप तयार करून कोणीतरी व्हायरल केल्याचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. शिंदे यांनी सांगितले.

दीड महिन्यापूर्वी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर याची चाैकशी करून तेथे रखवालदार नियुक्त करण्यात आला. रात्रीच्या वेळी बाह्यरुग्ण विभागाचे प्रवेशद्धार बंद करून काम संपल्यावर खाटा उभ्या करून ठेवण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले. मिरज शासकीय रुग्णालयातील चांगल्या कामाची दखल न घेता अशा किरकोळ चुकांची प्रसिद्धी करण्यात येत असल्याबद्दल डॉ. शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजRohit Pawarरोहित पवारTanaji Sawantतानाजी सावंत