सांगलीतील खंडणीखोरांना बसणार चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 03:59 PM2020-07-02T15:59:50+5:302020-07-02T16:02:27+5:30

सांगली जिल्ह्यातील खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक सुहैल शर्मा यांनी खंडणीविरोधी पथकाची स्थापना केली.

The pressure will be on the ransom seekers in Sangli | सांगलीतील खंडणीखोरांना बसणार चाप

सांगलीतील खंडणीखोरांना बसणार चाप

googlenewsNext
ठळक मुद्देसांगलीतील खंडणीखोरांना बसणार चापपोलिस अधिक्षकांकडून खंडणीविरोधी पथकांची स्थापना

सांगली : जिल्ह्यातील खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक सुहैल शर्मा यांनी खंडणीविरोधी पथकाची स्थापना केली.

जिल्ह्यात डॉक्टरांना खंडणीसाठी धमक्या येत असल्याच्या तक्रारी पोलिसाकडे आल्या होत्या. खंडणीविरोधी पथकामध्ये एक पोलीस अधिकारी व पाच पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती केली असून हे पथक स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या नियंत्रणाखाली काम पाहणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

जिल्हयात विशेषतः सांगली, मिरज शहरामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉक्टरांना काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्रास देत आहेत. या डॉक्टरांना खंडणी मागत असल्याची प्रकरणेही समोर आल्याने अधिक्षक शर्मा यांनी इंडीयन मेडीकल असोसिएशन यांच्यांशी चर्चा केली. त्यानंतर तातडीने खंडणी विरोधी पथक स्थापन करण्याचे आदेश दिले.

या पथकाकडून मेडीकल असोसिएशन बरोबरच व्यापारी संघटना, हॉटेल व्यवसायिक, सराफ असोसिएशन, बिल्डर असोसिएशन व उद्योगपतींना मदत करणार आहे. हे पथक मेडीकल असोसिएशन व इतर असोसिएशनना स्वतः भेटी देऊन त्यांचेशी वैयक्तीक रित्या संपर्क साधुन त्यांना कोण गुंड प्रवृत्तीचे लोक खंडणी मागतात किंवा इतर प्रकारे त्रास देतात याची विचारपुस करुन त्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कारवाई करणार आहे. जिल्हयातील सर्व खंडणी संबधीची प्रकरणांची पथकाकडून तपासणी होणार आहे.

खंडणीखोराची गोपनिय माहीती एकत्रित करुन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. जिल्हयातील सर्व प्रतिष्ठीत डॉक्टर, व्यापारी, बिल्डर, उद्योगपती यांनी गुंड प्रवृत्तीच्या इसमांकडुन त्रास होत असल्यास त्यांनी तात्काळ खंडणी विरोधी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहनही शर्मा यांनी केले.

Web Title: The pressure will be on the ransom seekers in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.