सांगलीत रंगभूमिदिनी नटराज पूजन, मोहन आगाशे, कीर्ती शिलेदार यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 14:12 IST2018-11-05T14:10:46+5:302018-11-05T14:12:39+5:30

सांगलीत सोमवारी रंगभूमिदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अखिल महाराष्ट्र  नाट्यविद्यामंदिर समितीच्यावतीने मुख्य नटराज पूजनाचा कार्यक्रम झाला. ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते नटराज पूजन झाले.

The presence of Sangliit Rangbhadhi Dini Natraj Poojan, Kirti Shiladar | सांगलीत रंगभूमिदिनी नटराज पूजन, मोहन आगाशे, कीर्ती शिलेदार यांची उपस्थिती

सांगलीत रंगभूमिदिनी नटराज पूजन, मोहन आगाशे, कीर्ती शिलेदार यांची उपस्थिती

ठळक मुद्देसांगलीत रंगभूमिदिनी नटराज पूजन, कीर्ती शिलेदार यांची उपस्थिती कलाकारांकडून नाट्य संगिताचे सादरीकरण

सांगली : सांगलीत सोमवारी रंगभूमिदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अखिल महाराष्ट्र  नाट्यविद्यामंदिर समितीच्यावतीने मुख्य नटराज पूजनाचा कार्यक्रम झाला. ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते नटराज पूजन झाले.

येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास यंदाच्या विष्णूदास भावे गौरव पदकाचे मानकरी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अभिनेते राजन भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भावे नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात नटराजपूजनाअगोदर विष्णूदास भावे यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. तर नटराज पूजनानंतर नाट्य संगिताचे सादरीकरण करण्यात आले. यात शहरातील हौशी कलाकरांनी सहभाग घेतला होता.

यावेळी डॉ. शरद कराळे, विनायक केळकर, श्रीनिवास जरंडीकर, मुकुंद पटवर्धन, भालचंद्र चितळे यांच्यासह नाट्यविद्यामंदिर समिती व नाट्य परिषद शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: The presence of Sangliit Rangbhadhi Dini Natraj Poojan, Kirti Shiladar