शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नशेत असाल तर मोटार सुरूच होणार नाही, सांगलीतील दहावीतल्या प्रेमने बनवली अपघात रोखणारी यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:57 IST

कॉपीराईटसाठी प्रयत्न

सांगली : नशेत वाहन चालविल्यामुळे झालेला अपघात त्याने एकदा पाहिला. तेव्हा त्याला ‘आयडिया’ सुचली. दीड वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम’ बनवली. मोटारचालकाने नशेत इंजिन सुरू केले तर तत्काळ मालकाला मोबाइलवर ‘व्हॉईस कॉल’ जाईल. ‘आपके कार का चालक नशेमे है’ असे ऐकवून ‘लोकेशन’देखील पाठवले जाईल. तसेच इकडे मोटारीचे इंजिनदेखील बंद पडेल, अशी सिस्टीम दहावीत शिकणाऱ्या प्रेम नवनाथ पसारे या विद्यार्थ्याने बनवली आहे.प्रेम पसारे याला वेगवेगळ्या प्रयोगाबद्दल लहानपणापासूनच कुतूहल आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने सुरक्षितपणे फटाके फोडता येतात हे पाहून स्वत:च रिमोट कंट्रोल बनवला. सतत वेगवेगळ्या कल्पना डोक्यात भिरभिरत असतानाच एकदा कुटुंबासमवेत फिरायला जाताना त्याने नशेत वाहन चालविल्यामुळे ते झाडावर आदळलेला अपघात पाहिला. तेव्हा असा अपघात रोखण्यासाठी काय करावे? असे विचारचक्र सुरू झाले. चालक जर नशेत असेल तर मोटार सुरूच होणार नाही, अशी सिस्टीम तयार करण्याविषयी प्रयत्न करू लागला.जवळपास दीड वर्षानंतर प्रेम याने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम’ बनवली. त्याच्या सिस्टीममधील सेन्सरमुळे चालकाने नशेत असताना जर मोटार सुरू केली तर तत्काळ मालकाच्या मोबाइलवर एक व्हॉईस कॉल जातो. गाडीचा क्रमांक, इंजिन, चेस नंबर, लोकेशन आदी माहितीबरोबर तुमच्या गाडीचा चालक नशेत असल्याचे कॉलवरून ऐकवले जाते. तसेच इकडे गाडीचे इंजिनदेखील बंद होते. त्यामुळे गाडीचा मालक तत्काळ चालकाला कॉल करून तू दारू पिला असल्याचे सांगून उतरायला भाग पाडू शकतो. प्रेमचे वडील नवनाथ पसारे यांचा चहाचा स्टॉल आहे. त्यांनी आणि सांगली हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी प्रेमला प्रेरणा दिली.

कॉपीराईटसाठी प्रयत्नप्रेम याने बनवलेली यंत्रणा मोटारीत बसवण्यासाठी साधारणपणे पंधरा हजारांपर्यंत खर्च येतो. तसेच यंत्रणा कार्यान्वित होण्यासाठी मोबाइलवर ॲप आवश्यक असते. परंतु त्यामुळे अपघात टळून लाखमोलाचा जीव वाचू शकतो. या सिस्टीमच्या कॉपीराईटसाठी वडिलांनी प्रस्ताव पाठवला आहे.