शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गाभण मादी गवा अपघातात गंभीर जखमी; सिझेरियन ऑपरेशनकरुन सांगली पशुसंवर्धनच्या डॉक्टरांनी दिले जीवदान

By अशोक डोंबाळे | Updated: January 13, 2026 18:55 IST

धाडसी कामगिरीबद्दल डॉक्टरांचे कौतुक

सांगली : कडगाव (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथे झालेल्या वाहन अपघातात गंभीर जखमी झालेल्या गाभण मादी गव्याला सांगली जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांनी वेळेत उपचार देत नवजीवन दिले. अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत केलेल्या सिझेरियन ऑपरेशनमुळे गव्याचा जीव वाचवण्यात यश मिळाले असून या धाडसी कामगिरीबद्दल डॉक्टरांचे कौतुक होत आहे.अपघाताची माहिती मिळताच डॉ. संतोष वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथून पशुसंवर्धन विभागाची तज्ज्ञ टीम तातडीने कडगाव येथे पोहोचली. तपासणीदरम्यान गव्याच्या पोटात अंतर्गत इजा व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आले. शिवाय ती गाभण असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होती. वासराची हालचाल मंदावल्याने गव्याचा जीव धोक्यात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.वनविभाग कोल्हापूर आणि पशुसंवर्धन विभाग वाळवा यांच्या संयुक्त प्रयत्नातून अत्यंत काळजीपूर्वक हे ऑपरेशन पार पाडण्यात आले. या धाडसी मोहिमेत डॉ. सचिन वंजारी, डॉ. संतोष वाळवेकर, डॉ. अंबादास माडकर, डॉ. प्रसाद पाटील, डॉ. प्रवीण निमसे आणि मुकुंद वाटेगावकर यांनी विशेष योगदान दिले.गव्याच्या प्रकृतीत सुधारणाअवघड परिस्थितीत केलेल्या या यशस्वी सिझेरियननंतर मादी रानगव्याच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सध्या तिच्यावर पुढील उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉ. संतोष वाळवेकर यांनी दिली.