विटा नगरपालिका ‘लेकीचं झाड’ उपक्रम राबविणार प्रतिभा पाटील : पर्यावरण रक्षणासाठी पालिकेचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 21:19 IST2018-06-16T21:19:55+5:302018-06-16T21:19:55+5:30
पर्यावरण रक्षणाचे प्रभावी काम करण्यासाठी विटा नगरपरिषद शहरात ‘लेकीचं झाड’ हा उपक्रम राबविणार असून,

विटा नगरपालिका ‘लेकीचं झाड’ उपक्रम राबविणार प्रतिभा पाटील : पर्यावरण रक्षणासाठी पालिकेचे पाऊल
विटा : पर्यावरण रक्षणाचे प्रभावी काम करण्यासाठी विटा नगरपरिषद शहरात ‘लेकीचं झाड’ हा उपक्रम राबविणार असून, पालकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केले.
नगराध्यक्षा सौ. पाटील म्हणाल्या, विटा शहरात मुलींच्या नावाने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी पालकांनी घ्यावी. नगरपरिषदेच्यावतीने चिक्कू किंवा आंबा झाडाचे रोप, संरक्षक जाळी मोफत देण्यात येणार आहे. त्या जाळीवर लेकीचं झाड म्हणून मुलीच्या नावाचा फलक लावण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांनी पर्यावरण रक्षण व मुलीच्या आठवणीसाठी जागा उपलब्ध असेल तेथे ‘लेकीचं झाड’ लावून या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी विटा शहरात राबविण्यात येणाऱ्या ‘लेकीचं झाड’ या उपक्रमासाठी लागणाºया खर्चाची तरतूद नगरपालिकेच्या विशेष सभेत करण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी होणाºया पालकांना नगरपरिषदेच्यावतीने फळझाडांची रोपे, जाळी मोफत दिली जाणार आहे. शहरात या उपक्रमासाठी २ हजार ५०० रोपे उपलब्ध करण्यात आली असून, पालकांनी नगरपरिषदेत संपर्र्क साधावा, असे आवाहन केले.