प्रशांत दामले यांच्या दातृत्वाचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 18:25 IST2021-02-22T18:24:45+5:302021-02-22T18:25:50+5:30
Prashant Damle Sangli- कोरोना काळात सलग दहा महिने रंगभूमीवरील पडद्यामागच्या कलाकारांना अभिनेते प्रशांत दामले यांनी मदतीचा हात दिला. या दातृत्वाबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रशांत दामले यांच्या दातृत्वाचा गौरव
सांगली : कोरोना काळात सलग दहा महिने रंगभूमीवरील पडद्यामागच्या कलाकारांना अभिनेते प्रशांत दामले यांनी मदतीचा हात दिला. या दातृत्वाबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना काळात सलग १० महिने रंगभूमीवरील बॅकस्टेजसाठी काम करणाऱ्या मुंबई येथील २५० कलाकार आणि तंत्रज्ञांना प्रशांत दामले आणि अनेक कलावंतांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली.
अजुनही ते काम सुरु आहे. त्याबद्दल नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने प्रशांत दामले यांचा सत्कार शाखेच्या उपाध्यक्षा अंजली भिडे, ज्येष्ठ संचालक चंद्रकांत धामणीकर, कोषाध्यक्ष भालचंद्र चितळे आणि हरिहर म्हैसकर यांनी केला.