शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग उद्योगाची वीज दरवाढ जैसे थे

By admin | Updated: August 31, 2015 22:08 IST

ऊर्जामंत्र्यांची घोषणा फोल : दरवाढ मागे घेण्याची यंत्रमाग धारकांना प्रतीक्षा

विटा : राज्यातील यंत्रमाग लघुउद्योगाचे वीजदर कोणत्याही परिस्थितीत वाढणार नाहीत, जी वाढीव दराने बिले आली असली, तरी यंत्रमागधारकांनी जुन्या दरानेच बिले भरावीत, जुन्या व नव्या दरातील बिलात असलेल्या फरकाच्या रकमेपोटी २०० कोटी रुपये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करून घेऊन यंत्रमाग लघुउद्योगाच्या वीज दरवाढीचा प्रश्न निकाली काढला जाईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असली तरी, यंत्रमाग लघुउद्योगाची वीज दरवाढ अद्यापही जैसे थे अशीच आहे. त्यामुळे ऊर्जामंत्र्यांची ही घोषणा फोल ठरली असून, यंत्रमागधारकांना वीज दरवाढ कधी मागे घेतली जाणार, याची प्रतीक्षा लागली आहे.राज्य विद्युत नियामक आयोगाने १ जूननंतरच्या वीज दराबाबतचा निर्णय जाहीर करताना यंत्रमाग व्यवसायातील २७ अश्वशक्तीच्या आतील ग्राहकांच्या वीजदरात सर्व करासहीत जवळपास ४५ पैसे प्रतियुनिट दरवाढ केली आहे. त्यावरील ग्राहकांना १५ ते २० पैसे युनिट दरवाढ लागू झाली आहे. अगोदरच इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात वीजदर जास्त असतानाच ही दरवाढ लादली गेल्याने राज्यभरातील यंत्रमागधारकांत प्रचंड नाराजी पसरली होती. यापार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत यंत्रमाग संघटनेचे प्रतिनिधी, संबंधित लोकप्रतिनिधी, ऊर्जा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्री बावनकुळे यांनी जुन्या दरानेच वीज बिले वसूल करावीत, फरकाची २०० कोटी रुपये रक्कम कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केली जाईल, असे महावितरणला सांगितले होते, तर यंत्रमागधारकांनाही जुन्या दरानेच वीजबिले भरण्याच्या सूचना केल्या होत्या.यानुसार इचलकरंजी येथील यंत्रमागधारकांनी वाढीव बिलाची रक्कम कमी करून घेऊन वीज बिले भरली. परंतु, पुढील महिन्याच्या बिलातून कमी झालेली थकित रक्कम व्याजासह पुन्हा आकारून आली आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांत गोंधळाचे वातावरण पसरले आहे. ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या घोषणेनंतरही यंत्रमाग लघुउद्योगाचे वीजदर कमी न झाल्याने ऊर्जामंत्र्यांनी दिलेले आश्वासन व केलेली घोषणा फोल ठरली आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांना वीजदर वाढ कमी होण्याची प्रतीक्षा लागली आहे. (वार्ताहर)