शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

सांगली महापालिकेसाठी राजकीय महायुध्द सुरू : भाजपची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 00:00 IST

महापालिकेच्या रणधुमाळीला सोमवारपासून सुरुवात झाली. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच राजकीय पक्षांच्या हालचालींना गती आली आहे

ठळक मुद्दे काँग्रेसची सत्ता राखण्याची, तर राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी लढाई; सुधार समितीचे आव्हान

सांगली : महापालिकेच्या रणधुमाळीला सोमवारपासून सुरुवात झाली. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच राजकीय पक्षांच्या हालचालींना गती आली आहे. विद्यमान सत्ताधारी काँग्रेससमोर सत्ता टिकविण्याची, तर विरोधी राष्ट्रवादीसमोर अस्तित्व टिकविण्याची लढाई आहे. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची या निवडणुकीत खरी कसोटी लागणार असून या पक्षाचे सध्या केवळ दोन सदस्य आहेत व त्यांच्यासमोर ही संख्या ४० वर नेण्याचे दिव्य असेल.

गेल्या महिन्याभरापासून महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा रंगली होती. गतवेळी ७ जुलैला मतदान झाले होते. त्यासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू झाली. पण यंदा जून महिन्याचा तिसरा आठवडा उजाडला तरी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत नव्हता. अखेर सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने महापालिका सत्तासिंहासनाच्या युद्धाचा शंखनाद केला.

सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोगाने तयारीचा आढावा घेतला. त्याचवेळी आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याचे जाहीर केले. सध्या महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. गत निवडणुकीत काँग्रेसला ४३ जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादीला २६ (सहयोगी सदस्यांसह). स्वाभिमानी आघाडीला ११ जागांवर समाधान मानावे लागले होते. गेल्या पाच वर्षात कृष्णेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. काँग्रेसअंतर्गत संघर्ष, सुंदोपसुंदीने विकासाला गती देता आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका विरोधक की सत्ताधारी अशीच राहिली, तर स्वाभिमानी आघाडीही अस्तित्वासाठी झुंजत होती.

गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात भाजपने राजकीय मांड पक्की केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रथमच मोठ्या प्रमाणात कमळ फुलले आहे. आता काँग्रेसच्या ताब्यातील एकमेव सत्तास्थान असलेल्या महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. दुसरीकडे भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत.

शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. काही प्रभागांमध्ये त्यांचेही मतदार असल्यामुळे त्यांच्या उमेदवारांचा परिणाम होणार आहे. जिल्हा सुधार समिती व आम आदमी पक्षाने स्वतंत्र आघाडी करीत मैदानात उतरण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बहुरंगी लढतींचे चित्र दिसत आहे.महापौरपद : ओबीसी महिलेलाआगामी महापौरपद नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) महिलेसाठी आरक्षित आहे. एकूण २० प्रभागांतील अकरा जागा ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढतींना मोठे महत्त्व येणार आहे. हे अकरा प्रभाग सोडून सर्वसाधारण प्रवर्गातून एखादी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला निवडून आल्यास तीदेखील महापौर पदाची दावेदार ठरू शकते. परंतु तशी संधी मिळण्याची शक्यता फारच धूसर असते. नागरिकांचा मागास वर्ग महिलांसाठी आरक्षित झालेले प्रभाग असे : प्रभाग १, २, ४, ७, ८, १०, १४, १५, १७, १८ व १९.१४२ सैनिक करणार मतदानमहापालिका निवडणुकीसाठी प्रथमच सैनिकांना मतदान करता येणार आहे. तशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. महापालिका क्षेत्रात १४२ सैनिक आहेत. त्यांची नावे मतदार यादीत असली तरी, त्यांचे पत्ते अद्याप प्रशासनाला मिळालेले नाहीत. त्यामुळे या सैनिकांना नेमक्या कोणत्या प्रभागाच्या मतपत्रिका पाठवायच्या, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे संबंधित सैनिकांनी त्यांचा राहण्याचा पत्ता जिथे असेल त्याची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे आवश्यक त्या पुराव्यानिशी द्यावी. त्यानुसार त्यांचा त्या प्रभागात समावेश होणार आहे, असे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी सांगितले.सव्वाचार लाख मतदारमहापालिकेसाठी ४ लाख २३ हजार ३६६ मतदार आहे. यात २ लाख १५ हजार ८९ पुरुष, २ लाख ८ हजार २४० स्त्री व इतर ३७ मतदारांचा समावेश आहे. अंतिम मतदार यादी २ जुलैला प्रसिद्ध होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीElectionनिवडणूक