शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: चौकशीसाठी गेलेल्या पोलिस पथकावर किल्लेमच्छिंद्रगडला हल्ला, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:16 IST

मारहाणीच्या चौकशीसाठी गेले होते पथक, चौघे हल्लेखोर ताब्यात

इस्लामपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे एकाच्या डोक्याला पिस्तूल लावून दमदाटी केल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावरच चौघांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा प्रकार शनिवारी सायंकाळी ७ वाजता घडला. याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.दरम्यान, जखमी हवालदार जालिंदर पांडुरंग माने यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अतुल शंकर साळुंखे, ओंकार मोहन कदम, कांचन शंकर साळुंखे, मयुरी अतुल साळुंखे अशा चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील हत्यार व दुचाकी जप्त केली आहे. न्यायालयाने चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.इस्लामपूर पोलिसांचे पथक डायल ११२ या वाहनातून पेट्रोलिंग करत होते. वाळवा तालुक्यातील बहे, नरसिंहपूर मार्गे किल्लेमच्छिंद्रगड गावच्या कमानीजवळ आले असता, तिथे दुचाकीवरून घाबरलेल्या अवस्थेत निघालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांना हात करून थांबवले. त्यातील एकाने माझ्या वडिलांच्या डोक्याला पिस्तूल लावून दमदाटी करून विजय सांळुखे व ओंकार कदम निघून गेले आहेत. त्यांना ताबडतोब पकडा, असे सांगितल्याने पोलिसांचे पथक गावामध्ये गेले होते.पथकातील जालिंदर माने, आकाश सावंत, अजय काळे हे विजय साळुंखे याच्या घराजवळ जाऊन घटनेबाबत चौकशी करू लागले. यावेळी अतुल साळुंखे याने मोबाईलवरून कोणाला तरी ‘तू लवकर पिस्तूल घेऊन ये, आज पोलिसांना जिवंत ठेवायचे नाही. त्यांना गोळ्या घालायच्या’, अशी दमदाटी केली. त्याचवेळी मोटारीतून एकजण आला. त्यानंतर अतुल साळुंखे याने दुचाकीला लावलेला ऊस तोडणीचा कोयता घेऊन हवालदार जालिंदर माने यांच्या डोक्यात वार केला. त्यांनी तो चुकवून दोन्ही हाताने अडवला. यात माने यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळ जखम झाली.याचवेळी पोलिस कर्मचारी आकाश सावंत यांनी ओंकार कदम याच्या हातातील कोयता काढून घेत असताना अतुल व ओंकार यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यात सावंत यांच्या तळहाताला कोयता लागून जखम झाली. तसेच दोन महिलांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. या हल्ल्यानंतर पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस निरीक्षक किरण दीडवाघ अधिक तपास करत आहेत.

पिस्तुलाबाबत चौकशीपोलिस चौकशीसाठी गेल्यानंतर संशयित अजय साळुंखे याने कोणाला तरी कॉल करून ‘पिस्तूल घेऊन ये, पोलिसांना गोळ्या घालायच्या आहेत’, असे सांगितले होते. त्यामुळे कोणाला कॉल केला, पिस्तूल कोणाकडून मागवण्याचा प्रयत्न केला, याची पोलिस चौकशी करत आहेत.