शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- अर्भक चोरी प्रकरण: बाळाला दूध पावडरवर जगवलं, ५६ तासांत महिला, बाळ ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 14:23 IST

..त्यातून तिने मूल पळवण्याचा प्लॅन केल्याचा अंदाज 

मिरज : येथील शासकीय रुग्णालयातून चोरीला गेलेल्या नवजात बाळाला ५६ तासांत शोधून काढण्यात पोलिसांना यश मिळाले. बाळ चोरणारी महिला व नवजात बालकाला तासगाव तालुक्यातील सावळज येथून ताब्यात घेण्यात आले. दोन दिवस दूध पावडर पाजल्यानंतरही बाळाची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. बाळ पुन्हा कुशीत विसावल्यानंतर आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आईपासून दुरावलेल्या नवजात बालकाची भेट पोलिसांनी पुन्हा घडविली. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून शनिवारी दुपारी तीन दिवसांचे नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती.एका अज्ञात महिलेने या बालकाला पळवून नेल्याने खळबळ उडाली होती. कोळे (ता. सांगोला) येथील कविता समाधान आलदर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल होती. अज्ञात महिलेने नवजात अर्भकाला पळवून नेल्याने मातेसह कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

पोलिसांनी विविध ठिकाणी तपास पथके पाठवली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व सावळज गावातून मिळालेल्या माहितीच्या आधारे सावळज येथील सारा साहेबा साठे (वय २४) या महिलेस बाळासह ताब्यात घेतले. अपहरणप्रकरणी महिलेविरुद्ध गांधी चौक पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली. दोन दिवस गाजत असलेल्या या प्रकरणातील अपहृत बाळ सुखरूप सापडल्याने पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला.

गर्भपात झाल्यानंतर अस्वस्थसारा साठे हिचा दीड वर्षापूर्वी सावळज येथील साहेबा साठे या पेंटरसोबत प्रेमविवाह झाला आहे. लग्नानंतर तिचा गर्भपात झाल्याने ती मुलासाठी अस्वस्थ होती. त्यातून तिने मूल पळवण्याचा प्लॅन केल्याचा अंदाज आहे.

प्रसुती झाल्याचं गावात सांगितलंसारा साठे हिने बाळ पळवून नेल्यानंतर गावात शेजाऱ्यांना तिची महिन्यापूर्वी दुसऱ्या गावी प्रसूती झाल्याचे खोटे सांगितले होते.

दूध पावडरवर जगवलंनवजात बाळाला तिने दोन दिवस दूध पावडर पाजले होते. आईच्या दुधापासून तीनच दिवसांत वंचित झालेल्या बाळाची दूध पावडर पिऊनही प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल