शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: जतमधील दोन्ही खुनांचा छडा; लग्नाच्या तगाद्यातून महिलेला संपविले, तर जमिनीच्या वादातून बिळूरच्या तरुणाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:13 IST

मृताच्या मोबाइलच्या सीडीआरवरून २४ तासांच्या आत या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले

जत : जत तालुक्यात सोमवारी खुनाच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या. यांतील अनोळखी महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी उमदी येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सिद्धाप्पा मदाप्पा आमागोडरू (वय ३७, रा. हळदोडवरू गल्ली, उमदी) असे संशयिताचे नाव आहे; तर मृत महिलेची ओळख पटली असून तिचे नाव सविता विजय घोडके (३२, रा. वांगी, ता. कडेगाव) असे आहे. लग्नाचा तगादा लावल्याने त्यांचा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. बिळूर येथील खून हा जमिनीच्या वादातूनच झाला असून या प्रकरणी दोन सख्ख्या भावांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी जतजवळ अनोळखी महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. मृताच्या मोबाइलच्या सीडीआरवरून २४ तासांच्या आत या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. मृत सविता हिचे मूळ गाव जत तालुक्यातील उटगी आहे. तिचे लग्न १० वर्षांपूर्वी वांगी येथील विजय घोडके यांच्याशी झाले.काही वर्षांपूर्वी तिची उमदीच्या सिद्धाप्पा आमागोडरू याच्याशी तिची ओळख झाली. त्यानंतर तिने सिद्धाप्पाकडे लग्नाचा तगादा लावला होता; पण त्याचेही लग्न झाले असल्याने तो नकार देत होता. त्यामुळे सविताने सिद्धाप्पाच्या घरासमोर मुलाबाळासह पेटवून घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.सविता २८ मार्चला सासरहून जतला आली. येथे सिद्धाप्पाची भेट झाल्यावर पुन्हा तिने लग्नाचा तगादा लावला. यामुळे चिडून सिद्धाप्पा तिला दुचाकीवरून अमृतवाडी येथील एका शेतात घेऊन गेला. तिथे पुन्हा वाद झाल्यानंतर सिद्धाप्पाने तिचा ओढणीने गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून केला. पोलिसांनी सिद्धाप्पाला ताब्यात घेतले आहेत.बिळूरचा खून जमिनीच्या वादातूनचबिळूर येथील श्रीधर निंगोडा यडगोंड याचा जमिनीच्या वाद आणि सामायिक विहिरीच्या पाणीवाटपातूनच खून झाल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी दोघा सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल झाला आहे. प्रभाकर निंगोडा यडगोंड आणि गंगाधर निगोंडा यडगोंड अशी संशयिताची नावे आहेत. यातील प्रभाकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मृताच्या आजोबांच्या नावे असलेल्या सात एकर जमिनीची वाटणी झाली होती. त्यातील एक हिस्सा संशयित प्रभाकर याने चुलत भावंडांना विकला होता. यातून मृत श्रीधर व प्रभाकर यांच्यात वाद सुरू होता. हा वाद विकोपाला गेल्याने प्रभाकर व निंगोडा या दोघांनी श्रीधर याचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Two murders solved; love triangle, land dispute the motives.

Web Summary : Two murders in Jat, Sangli solved. A woman was killed for demanding marriage. A man was murdered due to a land dispute with his cousins. Police have arrested suspects in both cases.