शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Sangli: खाकी वर्दी सावकारीला सोकावली, कोट्यवधींची जागा लाखात हडपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 17:33 IST

वरिष्ठांकडून चौकशीचा फक्त फार्सच, सुवर्णनगरीत कायद्याचीच गुन्हेगारी

सांगली : जिल्ह्यातील बेकायदेशीर सावकारीचे लोण आता विटा शहरातही फोफावले आहे. त्याचा मोह थेट खाकी वर्दीलाही सुटला आहे. बेकायदा सावकारीद्वारे पाच लाख रुपये व्याजाने देऊन कोट्यवधीची जमीन हडपण्याचा प्रकार पोलिसाने केला आहे. पिडीत कर्जदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यावर चौकशीचा फक्त फार्स सुरू आहे.विटा शहराला सुवर्णनगरी म्हटले जाते. इथल्या जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्या हडपण्याचा मोहात काही पोलिसही अडकले आहेत. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ म्हणून सामान्य माणसाला न्याय देऊन दुर्जनांना अद्दल घडविण्याऐवजी पोलिस दुर्जनांनाच हाताशी धरत असल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. मायाक्कानगरमधील रहिवासी आनंदा कदम यांना फायनान्स कंपनीचे कर्ज भरायचे होते. त्यामुळे त्यांनी एका खासगी बेकायदा सावकाराकडून पाच लाख रुपयांचे कर्ज ५ टक्के व्याजाने घेतले. त्यासाठी त्याच्याकडून रजिस्टर साठेखत व कुलमुखत्यारपत्र लिहून घेण्यात आले. व्याजाचे २५ हजार रुपयेही आगाऊ घेण्यात आले. पुढे काही हप्ते थकल्यानंतर सावकाराने तुझे साठेखत एका पोलिसाच्या नावावर असल्याचे सांगितले. मी दिलेल्या कर्जाचे पैसे व व्याजही त्याचेच आहे, असे म्हणत धमकावले. कर्जापोटी लिहून दिलेली जागा संबंधित सावकार पोलिसाने स्वतःच्या नावावर केल्याचेही स्पष्ट झाले. त्याचे नावही सातबाऱ्यावर चढले आहे.

अशी केली जागा हडपपाच लाखांच्या कर्जाचे व्याज थकल्याने आनंदा कदम यांच्यामागे सावकाराने वसुलीचा तगादा लावला. धमकावून पॅन कार्ड व आधार कार्ड घेतले. जबरदस्तीने त्यांच्या सह्या घेऊन १२.५ गुंठे जागा बक्षीसपत्राद्वारे संबंधित पोलिसाच्या नावावर लिहून घेतली. हा प्रकार विटा उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या हद्दीत घडला आहे. हा पोलिस कडेगाव तालुक्यातील पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. त्याची बहीण मुंबई पोलिस दलात सहायक पोलिस निरीक्षक आहे. ‘त्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही’ असे सांगत संबंधित सावकाराकडून कदम यांना तक्रार न करण्यासाठी वारंवार धमकावले जात आहे.‘तुमचे सगळे पैसे परत देतो, पण मला माझी वडिलोपार्जित जागा परत द्या’ म्हणून कदम कुटुंबीयांनी न्याय मिळण्यासाठी विटा पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे २३ डिसेंबरला तक्रार अर्ज दाखल केला आहे. पण त्यानंतर अजूनही न्याय मिळालेला नाही. कुंपणच शेत खाऊ लागले तर दाद कोणाकडे मागायची? अशी अवस्था विटा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सामान्य माणसांची झाली आहे.

‘त्या’च्या कारनाम्यांची चौकशी होणार का ?विटा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील संबंधित पोलिसाचा बेकायदेशीर सावकार व एजंटांना हाताशी धरून व्याजाने पैसे लावण्याचा धंदा सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत त्याने त्याच्या नातेवाईकांनी विटा व चितळी येथील काही जमिनी खरेदीचा सपाटा लावला आहे. या कारनाम्यांचीही चौकशी होणार का? असा सवाल तक्रारदाराने उपस्थित केला आहे.

तक्रारदाराचा अर्ज प्राप्त झाला आहे. पोलिसाच्या बेकायदा सावकारीच्या तक्रारीची चौकशी सुरू आहे. त्यामध्ये तो दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. - विपुल पाटील, पोलिस उपअधीक्षक, विटा

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी