शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मिरजेत भरवस्तीतील मोबाईल दुकान फोडले -सहा लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 11:01 PM

मिरजेत शनिवार पेठेत गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी भर वस्तीतील स्कायसेल मोबाईल हे दुकान फोडून सहा लाख रूपये किमतीचे मोबाईल चोरून नेले.

ठळक मुद्दे विविध कंपन्यांचे ४0 मोबाईल चोरीस

मिरज : मिरजेत शनिवार पेठेत गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी भर वस्तीतील स्कायसेल मोबाईल हे दुकान फोडून सहा लाख रूपये किमतीचे मोबाईल चोरून नेले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

शनिवार पेठेत मुख्य रस्त्यावर अभिजित सुस यांच्या मालकीचे स्कायसेल मोबाईल हे दुकान आहे. गुरूवारी मध्यरात्री दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दुकानातील शोकेसमधील विविध कंपन्यांचे ४० मोबाईल, ड्रॉव्हरमधील २४ हजार रोख रक्कम असे ६ लाख चोरून नेण्यात आले. शुक्रवारी सकाळी दुकानाचे शटर उचकटलेले दिसल्याने चोरीचा प्रकार समजल्यानंतर अभिजित सुस यांनी शहर पोलिसात तक्रार केली. पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. चोरटे दुकानातील किमती अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल घेऊन गेले. कमी किमतीच्या मोबाईलला चोरट्यांनी हात लावला नाही.चोरट्यांची कोणतीही वस्तू तेथे सापडली नसल्याने श्वानपथकाद्वारे चोरट्यांचा माग काढणे शक्य झाले नाही. चोरट्यांनी तेथून वाहनाने पलायन केल्याचा पोलिसांचा संशय आहे.

याप्रकरणी दुकानमालक अभिजित सुस यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून दुकानातून सहा लाखाचे मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुकानात सीसीटीव्ही यंत्रणा आहे. मात्र तांत्रिक बिघाडामुळे सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांचे चित्रण पोलिसांना मिळाले नाही. चोरीप्रकरणी पोलिसांनी सराईत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.एकच दुकान तीनवेळा फोडलेस्कायसेल हे मोबाईल दुकान यापूर्वी दोनवेळा फोडण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षात हे दुकान फोडून मोबाईल चोरून नेण्याचा हा तिसरा प्रकार आहे. दुकानात यापूर्वी दोन वेळा चोरी करणारे आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. दुकानाच्या शटरला दोन्ही बाजूस कुलपे व मध्यभागीसुध्दा लॉक असताना चोरट्यांनी शटरखाली जॅक लावून शटर उचकटले. शटरलगत असलेला लाकडी दरवाजा फोडून आत प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले.मिरजेतील मोबाईल दुकानाचे शटर चोरट्यांनी उचकटून ऐवज लंपास केला.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी