शहरं
Join us  
Trending Stories
1
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
2
'या' चार राज्यांमध्ये मोठा उलटफेर होणार; भाजप जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता
3
शिक्षक मतदारसंघासाठी भाजपची उमेदवारी नक्की कोणाला?
4
"मला T20 World Cup बघायचाही नाही, जेव्हा मी...", रियान परागचं अनोखं विधान
5
आजचे राशीभविष्य: सरकारी लाभ, यश-कीर्ती वृद्धी; पद-प्रतिष्ठा वाढ, सुखकारक दिवस
6
मे महिन्यात देशभरात उष्माघाताचे ४६ बळी; तीन महिन्यांत ५६ मृत्यू, महाराष्ट्रात ११ जण मृत्युमुखी
7
अरुणाचलमध्ये भाजपच; सिक्कीम ‘एसकेएम’चेच; दोन राज्यांमधील विधानसभा निवडणूक
8
प्रदोष शिवरात्रीचा शुभ संयोग: ‘असे’ करा व्रताचरण; पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता
9
पंचग्रही अद्भूत शुभ योग: ७ राशींना लाभ, लॉटरीची संधी; राजकारण्यांना यश, इच्छापूर्तीचा काळ!
10
WI vs PNG : हलक्यात घेऊन चालणार नाही! नवख्या संघानं वेस्ट इंडिजला घाम फोडला, कसाबसा सामना जिंकला
11
पंचग्रही योग: ‘या’ ५ मूलांकांना सुख-समृद्धी काळ, धनलाभाची संधी; पद-पैसा वृद्धी, शुभ होईल!
12
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
13
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे तिहार तुरुंगात आत्मसमर्पण
14
जोकोविचला पाच सेटपर्यंत करावा लागला संघर्ष, रॉजर फेडररच्या विक्रमाशी केली बरोबरी
15
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
16
उद्योगपती गौतम अदानी भारतात सर्वात श्रीमंत, जगात सर्वाधिक श्रीमंतांकडे किती संपत्ती? 
17
नव्या उच्चांकासाठी बाजार सज्ज, एक्झिट पोलमधून देशात स्थिर सरकारचे येण्याचे संकेत
18
अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
19
प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम
20
एआय एक्झिट पोलमध्येही 'कमळ'; पण इंडियाच्याही जागा वाढणार

सांगली जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात पोलिसांची मोहिम; ६४ जण ताब्यात, सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 2:34 PM

सांगली : जिल्ह्यातील अवैध धंदे, जुगार, मटका, गावठी दारू याविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहिम उघडली आहे. गेल्या दोन दिवसांत अवैध ...

सांगली : जिल्ह्यातील अवैध धंदे, जुगार, मटका, गावठी दारू याविरोधात पोलिसांनी कारवाईची मोहिम उघडली आहे. गेल्या दोन दिवसांत अवैध दारूप्रकरणी २७ तर जुगार खेळणाऱ्या ३७ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलिस अधिक्षक दीक्षीत गेडाम यांनी अवैध धंद्याविरोधात कारवाी करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह सर्वच पोलिस ठाण्यांना दिले होते. विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. दारूचा अवैध साठा केल्याप्रकरणी २७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून एक हजारहून अधिक बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच गावठीदारूचे रसायन, लाकूड, पावडर असा ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.जुगार खेळणाऱ्याविरोधातही पोलिसांनी कडक कारवाई केली. जिल्ह्यातील ३७ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एका रिक्षासह दोन लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर ४५९ जणांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई अधिक्षक गेडाम, अप्पर पोलिस अधिक्षक मनिषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली, उपअधिक्षक अजय टिके, अशोक वीरकर, कृष्णात पिंगळे, रत्नाकर नवले, अश्विनी शेंडगे, पद्मा कदम, सुरेखा दुग्गे, एलसीबीचे निरीक्षक अजय सिंदकर यांच्या पथकाने केली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी