सांगली जिल्हा क्रीडा संकुलात वृक्षारोपण, विविध जातीच्या 250 वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 15:57 IST2019-07-13T15:51:22+5:302019-07-13T15:57:50+5:30
सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा संकुल सांगली व स्टेट बँक ऑफ इंडिया पेंशनर्स असोसिएशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुल परिसरामध्ये विविध जातीच्या 250 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व खेळाडू व मान्यवरांना वृक्षलागवडीचे व वृक्षसंगोपनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

सांगली जिल्हा क्रीडा संकुलात वृक्षारोपण, विविध जातीच्या 250 वृक्षांची लागवड
सांगली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा संकुल सांगली व स्टेट बँक ऑफ इंडिया पेंशनर्स असोसिएशन, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा संकुल परिसरामध्ये विविध जातीच्या 250 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व खेळाडू व मान्यवरांना वृक्षलागवडीचे व वृक्षसंगोपनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, स्टेट बँक ऑफ इंडिया पेंशनर्स असोसिएशनचे ताम्हणकर व सर्व सदस्य, क्रीडा अधिकारी राजेंद्र घाडगे, शंकर भास्करे, क्रीडा मार्गदर्शक प्रशांत पवार, आरती हळिंगळी व जमीर अत्तार, मंदाकिनी पवार तसेच कर्मचारी उपस्थित होते.