शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

पाथरपुंज ठरले देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण, चेरापुंजीला टाकले मागे; यंदा किती मिमी झाला पाऊस.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 13:52 IST

विक्रमी पावसाची नोंद करणाऱ्या पाथरपूंजने यावर्षीही आपला दबदबा कायम ठेवला

शिराळा (जि. सांगली) : देशात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेरापुंजीला महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावाने मागे टाकले आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वसलेल्या पाथरपुंजने यावर्षीच्या पर्जन्यमानात चेरापुंजीवर मात केली आहे.इतकेच नाही, तर राज्यातील अतिवृष्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोयना, नवजा, महाबळेश्वर आणि वलवण या ठिकाणांही मागे टाकत पाथरपुंज पावसाचे नवे ‘माहेरघर’, म्हणून उदयास येत आहे.२०१९ पासून सातत्याने विक्रमी पावसाची नोंद करणाऱ्या पाथरपुंजने यावर्षीही आपला दबदबा कायम ठेवला आहे. १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याच काळात मेघालयातील चेरापुंजी येथे (१ जानेवारी ते ३१ ऑगस्ट) ६२७९.५० मिमी पाऊस झाला आहे. केवळ मान्सूनच्या काळाचा विचार केल्यास (१ जून ते ३१ ऑगस्ट) पाथरपुंजमध्ये ६८१३ मिमी, तर चेरापुंजीमध्ये ३९७५.१० मिमी पाऊस नोंदवला गेला आहे, ज्यातून दोघांमधील तफावत प्रचंड आहे.आजपर्यंत नोंदवलेल्या आकडेवारीनुसार :पाथरपुंज : ६८१३ मिमी, दाजीपूर : ५९९२ मिमी, वलवण : ५९११ मिमी, जोर : ५६१२ मिमी, नवजा : ५३६० मिमी, गगनबावडा : ५२४२ मिमी, महाबळेश्वर : ५१३६ मिमी, कोयना : ४३२१ मिमी. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की पाथरपुंजने इतर सर्व ठिकाणांपेक्षा मोठी आघाडी घेतली आहे.चेरापुंजीचे रेकॉर्ड धोक्यात?चेरापुंजीच्या नावावर सर्वाधिक पावसाचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. एकेकाळी (ऑगस्ट १८६० ते जुलै १८६१) येथे २६,४७१ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, अलीकडच्या वर्षांत पाथरपुंजमध्ये सातत्याने पडणाऱ्या विक्रमी पावसाला पाहता, हवामान बदलाच्या या काळात पर्जन्यमानाचे केंद्र पश्चिमेकडे सरकत असल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्येही पाथरपुंजने चेरापुंजीला मागे टाकले होते. हाच कल कायम राहिल्यास, देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून लवकरच पाथरपुंजचे नाव कोरले जाण्याची शक्यता आहे.

तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील गाव पाथरपुंजचे भौगोलिक स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. पाटण तालुक्यात असले तरी हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर, चांदोली अभयारण्यात वसलेले आहे. येथील काही घरे तिन्ही जिल्ह्यांमध्ये विभागली आहेत. कोयनेच्या दक्षिण टोकावर असूनही, येथे पडणाऱ्या पावसाचे पाणी थेट वारणा धरणात जमा होते, ज्यामुळे वारणा धरण भरण्यामध्ये या गावाचा सिंहाचा वाटा आहे.मान्सून २०२५ : पाथरपुंज व चेरापुंजी (१ जून ते ३१ ऑगस्टअखेर)ठिकाण - पर्जन्यमान (मिमी)

  • पाथरपुंज ६८१३
  • चेरापुंजी ३९७५.१०