शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

Maharashtra Vidhan Sabha 2019 : लढतींच्या मैदानातही पतंगराव कदमच सरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 4:14 PM

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्याच नावावर आहे. त्यांनी एकूण आठ विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यात एका पोटनिवडणुकीचाही समावेश आहे.

ठळक मुद्देलढतींच्या मैदानातही पतंगराव कदमच सरस जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम

शीतल पाटील सांगली : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्याच नावावर आहे. त्यांनी एकूण आठ विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यात एका पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. त्याखालोखाल जयंत पाटील, आर. आर. पाटील, अजितराव घोरपडे, अनिल बाबर, संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांनी आतापर्यंत सहावेळा निवडणूक लढविली आहे.विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला आहे. १९६२ पासून २०१४ पर्यंत विधानसभा निवडणुकीचा आलेख पाहता, सर्वाधिक आठ निवडणुका पतंगराव कदम यांनी लढविल्या आहेत. १९७८ ला पहिल्यांदा ते विधानसभेच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरले होते. त्यानंतर १९८० च्या निवडणुकीत ८६ मतांनी त्यांचा पराभव झाला.

१९८५ ला मात्र त्यांनी संपतराव चव्हाण यांचा पराभव करीत विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९९० मध्येही ते विजयी झाले. १९९५ मध्ये त्यांचा संपतराव देशमुख यांनी पराभव केला; तर वर्षभराने झालेल्या पोटनिवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. १९९९ ते २०१४ या कालावधीतील सर्व निवडणुकीत मात्र पतंगराव कदम यांनी बाजी मारली.राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर १९९० मध्ये जयंत पाटील यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढविली. त्यानंतर आजअखेर त्यांनी सहा निवडणुका वाळवा मतदारसंघातून जिंकल्या आहेत. दिवंगत नेते आर. आर. पाटील, अनिल बाबर हेही याचवर्षी विधानसभेत पोहोचले होते. या दोघांनीही सहा निवडणुका लढल्या.

कवठेमहांकाळ मतदारसंघातून अजितराव घोरपडे १९८५ पासून निवडणुका लढत आहेत. आतापर्यंत त्यांनी सहा निवडणुका लढविल्या आहेत. त्यांना यश मिळण्यास १९९५ पर्यंत वाट पाहावी लागली. त्यानंतर १९९९, २००४ मध्ये पुन्हा निवडून आले. २००९ ला मतदार संघाची पुनर्रचना होऊन तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ तयार झाला. तेव्हा त्यांनी निवडणूक लढविली नाही. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ते पुन्हा मैदानात उतरले, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

आर. आर. आबांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक बिनविरोध झाली. आता पुन्हा ते नशीब अजमावत आहेत. भाजपचे खासदार संजय पाटील यांनीही दोनदा विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यात त्यांना यश आले नाही.संभाजी पवार, प्रा. शरद पाटील यांनीही सहावेळा विधानसभा निवडणूक लढविली. पवार यांना १९९९ व २००४ मध्ये पराभव स्वीकारावा लागला, तर २००९ मध्ये पुन्हा ते भाजपच्या चिन्हावर विजयी झाले. २०१४ मध्ये त्यांचे पुत्र पृथ्वीराज पवार मैदानात होते.

प्रा. शरद पाटील हेही १९८५ पासून निवडणुका लढवित आहेत. १९९० व १९९५ मध्ये ते विजयी झाले, तर एकदा पदवीधर मतदारसंघातून ते आमदार झाले होते. याशिवाय शिवाजीराव नाईक, उमाजी सनमडीकर यांनी पाचवेळा, तर मदन पाटील, पृथ्वीराज देशमुख, मानसिंगराव नाईक, शिवाजीराव देशमुख, विलासराव शिंदे यांनी चारवेळा विधानसभेची निवडणूक लढविली आहे.

टॅग्स :Patangrao Kadamपतंगराव कदमSangliसांगली