शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेत काँग्रेस-स्वाभिमानीचा पैरा

By admin | Updated: June 15, 2015 00:19 IST

विरोधकांचे बळ कमी : सत्ताधाऱ्यांचा एकहाती कारभार

सांगली : महापालिकेत विरोधी पक्ष आहे का? असा सवाल दरवेळी विचारला जातो. सत्तेत कोणीही असो, विरोधकांचे बळ नेहमीच कमी झाले आहे. सत्तेच्या राजकारणात विरोधी पक्षांची वाताहत ठरलेली असते. त्याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. सत्ताधारी काँग्रेसने मागासवर्गीय समितीच्या सभापती पदासाठी स्वाभिमानी आघाडीच्या बाळू गोंधळींना उमेदवारी देऊन पूर्वीचा पैरा फेडला. आता जिल्हा बँकेनंतर निर्माण झालेल्या नव्या समीकरणात भविष्यात राष्ट्रवादीच्या वाट्यालाही विषय समित्यांचे सभापतीपद मिळाल्यास आश्चर्य वाटू नये. महापालिकेच्या स्थापनेपासूनच विरोधकांची कमतरता नेहमीच जाणवली आहे. किशोर जामदार महापौर झाल्यानंतर विरोधकांचे अस्तित्वच संपुष्टात आले. सत्ताधारीच विरोधक म्हणून काम करू लागले, तर विरोधी पक्षातील नगरसेवक जामदारांच्या इशाऱ्यावर चालत होते. विकास महाआघाडी सत्तेत आल्यानंतरही हा प्रकार सुरू राहिला. इद्रिस नायकवडींच्या काळात विरोधी पक्ष असलेला काँग्रेस पक्ष सत्तेत गेला, तर सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक विरोधक म्हणून काम करू लागले. आता पालिकेत काँग्रेसकडे पूर्ण बहुमत आहे. तरीही त्यांना विरोधी पक्षांच्या मतांची गरज भासते. त्यासाठी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या महापौर निवडीवेळी स्वाभिमानी आघाडीला साकडे घालण्यात आले. बहुमत सिद्ध करण्याच्या नादात विरोधकांचे उंबरठे झिजविले गेले. त्यातून स्वाभिमानी आघाडीला सभापती पदाचा शब्द देण्यात आला, अशी चर्चा होती. आता ती खरी ठरली आहे. मागासवर्गीय समितीच्या सभापती पदासाठी काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या अधिक असतानाही स्वाभिमानी आघाडीला संधी देण्यात आली. बाळू गोंधळी यांचा अर्ज काँग्रेसकडून भरण्यात आला. महापौर व प्रभाग समितीमध्ये स्वाभिमानीने केलेला पैरा यानिमित्ताने काँग्रेसने फेडला. विरोधी राष्ट्रवादी व स्वाभिमानी एकत्र आले, तर दोन प्रभाग समित्यांवर वर्चस्व राखू शकतात. शिवाय स्थायी समितीत काँग्रेसच्या नाराज गटाला सोबत घेतल्यास काँग्रेसच्या वर्चस्वाला शह देऊ शकतात. पण पालिकेच्या राजकारणात तरबेज असलेल्या काँग्रेस नेत्यांपुढे विरोधकांचे कितपत चालते, हे पाहणेही रंजक असेल. त्यामुळेच राष्ट्रवादीला पदाची संधी असल्याची चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी) राजकारणाला कलाटणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून जिल्ह्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आ. जयंत पाटील व माजी मंत्री मदन पाटील एकत्र आले होते. तेव्हा पालिकेच्या राजकारणातही काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली होती. सध्या तरी दोघांनी सवतासुभा मांडला आहे. येत्या आॅगस्टमध्ये स्थायी समिती व प्रभाग समिती सभापतींच्या निवडी होणार आहेत.