सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा कहर वाढत असतानाच, रेकॉर्डब्रेक रुग्णांची नोंद झाली. यात महापालिका क्षेत्रातील रुग्णांचा समावेश आहे, तर सांगली शहरातील नळभाग आणि कृष्णाघाट परिसर येथील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ...
या सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. शेतकऱ्यांचा पुळका घेऊन बोलणारे नेते आज शेतकऱ्यांसाठी काय करताय? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. ...
मिरजेतील वखारभागात नागोबा कट्टा येथील ५० वर्षे जुनी झाडे तोडण्यास विरोध करणाऱ्या महिलेस महापालिका अधिकाऱ्यांनी फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे. संघर्ष समिती व सेव्ह मिरज सिटीतर्फे झाडे वाचविण्यासाठी चिपको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर झाला. जिल्ह्याचा ९७.२२ टक्के निकाल लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत १३.४ टक्क्याने निकालात वाढ झाली आहे. ...
पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील केदारवाडी (ता. वाळवा) हद्दीतील देसाई मळ्याजवळ सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक वर्षाचा बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला. या वर्षाच्या मादी जातीच्या बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर शेतकरी व वाहनधारका ...
अन्य क्षेत्रांबरोबरच कोरोनाने बँकिंग क्षेत्रातही प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी एक रुग्ण सापडल्याने हादरलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत मंगळवारी आणखी दोन रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...
सांगली शहरातील खणभाग येथील एका नगरसेवकाच्या भावासह बँक कर्मचार्याला मंगळवारी कोरोनाची लागण झाली. सध्या महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन असला तरी रुग्णांच्या संख्येत मात्र दिवसेंदिवस वाढ होत आहे. ...
आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात रॅपिड अँटिजेन टेस्ट सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी या टेस्टसाठी घाबरून जाऊ नये, उलट ही चाचणी विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण आहे. लवकरच जिल्हाभरात २० हजार चाचण्या घेण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ ...