आमच्या शर्यतीने नेत्याची झोप उडाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:26 IST2021-09-11T04:26:31+5:302021-09-11T04:26:31+5:30
गोटखिंडी : आम्ही शेतकऱ्यांची अस्मिता जपण्यासाठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. या शर्यतीने जिल्ह्यातील एका नेत्याला रात्रभर झोप नाही ...

आमच्या शर्यतीने नेत्याची झोप उडाली
गोटखिंडी : आम्ही शेतकऱ्यांची अस्मिता जपण्यासाठी बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले होते. या शर्यतीने जिल्ह्यातील एका नेत्याला रात्रभर झोप नाही लागली. हा गडी रात्रभर शासकीय यंत्रणेला फाेन करत गुन्हे दाखल करा, अटक करा, असे सांगत होता; पण आम्ही गनिमीकाव्याने बैलगाडी शर्यतीचे आयोजन फत्ते केले, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
गोटखिंडी (ता. वाळवा) येथील उपसरपंच विजय पाटील व त्यांच्या मित्र परिवाराने आयोजित केलेल्या कोरोना योध्द्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
माजी मंत्री, आ. सदाभाऊ खोत, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, उपाध्यक्ष भगवान पाटील, विक्रम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदाभाऊ खोत म्हणाले, गोटखिंडी गाव नेहमी सत्तेच्या प्रवाहाविरोधात राहणारे गाव आहे. कोणतीही चळवळ अथवा आंदोलनात हे गाव नेहमी अग्रेसर असते.
यावेळी विनायक जाधव, लालासाहेब पाटील, हुतात्मा बझारचे अध्यक्ष दिनकर बाबर, बी. आर. थोरात, अशोक पाटील, सविता पाटील, विनायक पाटील, संभाजी पाटील, विनायक पाटील, दादा गावडे आदी उपस्थित होते.
चाैकट
घराणेशाहीने राज्याची वाट लागली
गोपीचंद पडळकर म्हणाले, राज्यातील सरकार पुरोगामी असल्याचा दिखावा करते; पण वास्तविक हे सरकार घराणेशाहीने चालणारे आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या घराणेशाहीने महाराष्ट्राची पुरती वाट लावली आहे.