शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
2
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
3
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
4
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
5
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
6
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
7
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
8
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
9
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
10
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
11
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
12
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
13
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
14
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
15
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
16
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
17
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
18
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
19
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
20
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

जयंतराव असतील तर आमची उपस्थिती!

By admin | Updated: November 14, 2014 23:23 IST

उलटसुलट चर्चा : कारखाना गळीत हंगामास बहुतांशी पदाधिकाऱ्यांची दांडी

अशोक पाटील - इस्लामपूर -जयंत पाटील यांनी १९९९ पासून सलग १५ वर्षे राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद सांभाळले. या काळात त्यांच्या मतदारसंघातील त्यांचे एकनिष्ठ, पै-पाहुणे आणि राजारामबापू उद्योग समूहातील पदाधिकारी त्यांच्या अवतीभवती वावरत. आता मंत्रीपद गेल्यानंतर प्रथमच राजारामबापू साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. या कार्यक्रमात जयंत पाटील अनुपस्थित राहणार असल्याचे कळताच बहुतांश पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला दांडी मारली. यावरून जयंत पाटील असतील तरच आमचीही उपस्थिती राहील, अशी भूमिका या मंडळींची राहील, असे दिसत आहे.राजारामबापू कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी व जत या शाखांच्या गळिताचा प्रारंभ एकाच दिवशी झाला. अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी, इस्लामपूर पालिकेचे सत्ताधारी नगरसेवकांना दिले होते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना पत्रही पाठविले होते. निमंत्रणपत्रिकेवर प्रमुख पाहुण्यांसह जयंत पाटील यांच्या नावाचा समावेश होता. परंतु ऐनवेळी पाटील यांना शरद पवार यांनी मुंबई येथे बोलावून घेतले. त्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीत हे अगोदरच समजले. परिणामी अनेक पदाधिकारी व नेहमी त्यांच्या आजुबाजूला असणाऱ्यांनी गळीत हंगाम कार्यक्रमाला दांडी मारली. याची चर्चाही कार्यक्रमस्थळी होती. गर्दी कमी असल्याचे पाहून मंत्रीपद गेल्यानंतर पाटील यांचा दबदबा कमी झाला का, असाही सवाल उपस्थित केला जात होता. कारखान्याची दुसरी शाखा सुरू होईपर्यंत ज्यांनी साखर वर्ज्य केली होती, त्या जनार्दनकाका पाटील व त्यांचे पुत्र माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील गव्हाणीत उसाची मोळी टाकण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर हजर झाले. असाच प्रकार अनेक नेत्यांबाबत घडला. ज्यांच्या मागे कसलीही ताकद नाही, असे पदाधिकारी मात्र पुढे-पुढे करून तोरा मिरवत होते. जयंत पाटील कार्यक्रमास उपस्थित असते, तर असे घडले असते का?, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची घोडदौड सुरू आहे. एकाच दिवशी चार कारखान्यांच्या गळीत हंगामाचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागली. या कार्यक्रमाचे निमंत्रण उद्योग समूहातील पदाधिकारी, पालिकेतील सत्ताधाऱ्यांना दिले होते. याव्यतिरिक्त स्वत:च्या सहीची पत्रेही पाठविली होती.- पी. आर. पाटील, अध्यक्ष, राजारामबापू साखर कारखाना