शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News:..अन्यथा खुनाच्या गुन्ह्यात अडकवेन, भाजप पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस नगरसेविका पतीला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 12:38 IST

'संजयनगरमधील राजकारणाचा शेवट एक तर कळंबा, येरवडा जेलमध्ये किंवा थेट स्मशानात जातो'

सांगली : संजयनगरमधील राजकारणामध्ये लक्ष घालू नका, अन्यथा तुम्हाला खुनाच्या गुन्ह्यात अडकवेन. राजकारणाचा शेवट कळंबा, येरवडा जेल, तसेच स्मशानभूमीकडे जातो, अशी धमकी भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी दिल्याची माहिती काँग्रेसच्या नगरसेविका वर्षा निंबाळकर यांचे पती अमर निंबाळकर यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात मानेविरोधात तक्रार दिल्याचेही निंबाळकर यांनी सांगितले. निंबाळकर म्हणाले, ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भाजपचे संघटन सरचिटणीस माने यांचा दूरध्वनी आला. संजयनगरचे राजकारण वेगळ्या वळणावर आहे. काँग्रेसचे नगरसेवक मनोज सरगर यांच्याबरोबर फिरू नको. त्यांच्यासह १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसे तुमचेही नाव गुन्ह्यात घातले असते. येथील राजकारणाचा शेवट एक तर कळंबा, येरवडा जेलमध्ये किंवा थेट स्मशानात जातो. यापुढे संजयनगरमध्ये खून झाल्यास त्यात तुमचेही नाव घातले जाईल, अशी धमकी दिली.राजकीय सुडातून माने यांनी धमकी दिली आहे. आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा त्यांचा डाव आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात माने यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कलम ५०६ व ५०७ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. धमकीची ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली आहे. त्यांनी माने यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही निंबाळकर यांनी केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीBJPभाजपाPoliceपोलिस