शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
2
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
3
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
4
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
5
“३९ वर्षे संघटनेत, निष्ठावंतांची तुमच्याकडे काय किंमत?”; ठाकरेंना सवाल करत बडा नेता शिवसेनेत
6
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
7
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
8
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं
9
KL Rahul: द.आफ्रिकेविरुद्ध केएल राहुल इतिहास रचणार? मोठ्या विक्रमापासून फक्त १५ धावा दूर!
10
पार्थ पवारांच्या कंपनीकडून आणखी एक फसवणूक; जमीन खरेदीचा १४७ कोटींचा नजराणाही बुडवला
11
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
12
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
13
Share Market Today: Nifty ची सुस्त सुरुवात, सेन्सेक्सच्या ३ दिवसांच्या तेजीवर ब्रेक; IT शेअर्स धडाम
14
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
15
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
16
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
17
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
18
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
19
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
20
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर

सांगलीतील पर्यायी रस्तेच संकटात

By admin | Updated: March 29, 2017 23:42 IST

मुख्य रस्त्यांवरच वाहतुकीचा ताण : महापालिका, लोकप्रतिनिधींच्या अनास्थेने नागरिकांचा जीवघेणा प्रवास

शीतल पाटील ल्ल सांगली शहराची ओळख त्या शहरातील रस्त्यांवरून होत असते. मात्र सांगलीची ओळख आता खड्डेमय शहर अशी होऊ लागली आहे. त्यात प्रत्येक चौकात वाहतुकीची कोंडी नेहमीचीच आहे. सांगलीच्या कोणत्याही बाजूने दुसऱ्या बाजूला जाताना शहरातून मार्ग काढावा लागतो. पर्यायी रस्त्यांची व्यवस्था असली तरी, हे रस्ते कुठे ना कुठे अडविले गेले आहेत, तर कुठे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. मतांचे गणित घालणाऱ्या लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पर्यायी रस्त्यांची संकटातून सुटका करावी, असे कधीच वाटलेले नाही. सांगलीतील मुख्य रस्त्यावर सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते. अवजड वाहतूक करणारी वाहने शहराच्या मुख्य चौकातून वळविताना वाहनचालकांची कसरत होते. त्यात सारेच मुख्य रस्ते खड्ड्यात गेले आहेत. एकही रस्ता सुस्थितीत नसल्याची ओरड नागरिक करीत असतात. नगरसेवक विशिष्ट भागातील रस्ते चकाचक करतात, पण दोन नगरसेवकांच्या सीमारेषेवरील मुख्य रस्त्यांकडे कधीच लक्ष दिले जात नाही. आयुक्त, महापौर, स्थायी समिती सभापती, उपमहापौर एवढेच काय आमदार, खासदारही मुख्य रस्त्यापेक्षा गल्ली-बोळातील रस्ते करण्यावरच भर देत असतात. यामागे मतांचे राजकारण असले तरी, मुख्य रस्ते अधिक आवश्यक आहेत, याचे भान मात्र त्यांना कधीच नसते. याचा प्रत्यय सांगलीकरांना नेहमीच येत असतो. सांगलीच्या मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी व्हावा, यासाठी काही पर्यायी रस्ते झाले; पण आता हे रस्तेही अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. काही रस्त्यांची वर्षानुवर्षे सुधारणा झालेली नाही. काही रस्ते वादात अडकल्याने पूर्ण होऊ शकलेले नाहीत. शहरातील वाहतुकीवरचा ताण कमी व्हावा म्हणून पंचवीस वर्षांपूर्वी शंभरफुटी रस्ता झाला. कोल्हापूर रस्त्यावरील जोतिरामदादा आखाड्यापासून विश्रामबागपर्यंत हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला, पण खड्ड्यातून मुक्तता झाली नाही. पावलागणिक खड्डे, त्याच्या जोडीला दोन्ही बाजूस झालेल्या अतिक्रमणात रस्ता अडकला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे झाली आहेत. विविध दुकाने, हॉटेल्स, वाहन दुरुस्तीची गॅरेज आहेत. काही नागरिकांनी घरासमोर अतिक्रमण केले आहेच, पण दुकानदार आणि वाहन दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजनी रस्ताच अडवला. अस्तित्व संपले!शंभर फुटी रस्त्याचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. आता रस्ता वीस फुटी बनला आहे. रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेकडून मोहीम हाती घेतली जाते. पण ही मोहीम चार दिवसांचे नाटक ठरल्याने पुन्हा एकदा रस्ता अतिक्रमणात अडकला आहे. त्यात विश्रामबाग येथील वीज कंपनीच्या कार्यालयाजवळ हा रस्ता संपला आहे. स्फूर्ती चौक ते विश्रामबाग (आलदर चौक) हा रस्ता चौपदरी झाल्यास कोल्हापूरहून येणारी वाहने शहराबाहेरून मिरजेला जातील. दरवर्षी चौपदरीकरणासाठी महापालिकेकडून पावले उचलली जातात. दोन दिवस जुजबी कारवाई होऊन पुन्हा वर्षभर त्याकडे कोणीच पाहत नाही. रस्त्यावर अडथळेमिरजेतील कृपामयी हॉस्पिटलजवळच्या हनुमान मंदिरापासून सूतगिरणी, अहिल्यानगरमार्गे माधवनगरकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्थाही तशीच आहे. हनुमान मंदिराजवळच हा रस्ता अडविला आहे. जागेच्या मालकीचा वाद अजून मिटलेला नाही. शंभर मीटर अंतर सोडले तर, बाकीचा रस्ता दीडशे फुटी आहे. हा रस्ता बऱ्याच वर्षांपूर्वी करण्यात आला. सूतगिरणीपर्यंत रस्ता खराब झाला आहे. अहिल्यानगर ते माधवनगरपर्यंत नव्याने रस्ता करण्यात आला आहे. पण या रस्त्याकडेला झोपडपट्टी व घरे असल्याने काही ठिकाणी तो लहान आहे. रस्त्यांबाबत विचारच नाहीविजयनगर ते हसनी आश्रममार्गे धामणीला जाणारा रस्ताही शंभरफुटी आहे. हा रस्ता झाल्यास या परिसरातील वाहतूक थेट सांगलीबाहेरच होऊ शकते. मिरज रेल्वे पुलाकडून समतानगरमार्गे जाणारा जुना हरिपूर बायपास रस्ता शंभरफुटी आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यात हा रस्ता प्रस्तावित आहे. पण आजअखेर कुणीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. सांगलीत ईदगाह मैदान ते शांतिनिकेतनमार्गे माधवनगरकडे जाणारा जुना बुधगाव रस्ताही शंभरफुटी आहे. सांगलीवाडीतून माधवनगर रस्त्यावर आलेला बायपास रस्ता वगळता अन्य पर्यायी रस्त्यांवर चर्चाच झालेली नाही. रस्ता तीसफुटीचमिरज रस्त्यावरील विजयनगर परिसरात नव्याने जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालयाची इमारत होत आहे. लवकरच शासकीय कार्यालये तेथे स्थलांतरित होतील. विजयनगरहून कुपवाडकडे जाणारा मल्हारराव होळकर चौकापर्यंतचा रस्ता शंभरफुटी आहे. सध्या केवळ ३० फुटीच रस्ता वापरात आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाची गरज आहे. विजयनगर चौकात हातगाडीवाल्यांचे मोठे अतिक्रमण आहे. मल्हारराव होळकर चौक ते कुपवाड हा रस्ताही ६० फुटी आहे. पण त्याची अवस्था न पाहण्यासारखीच आहे. रिंगरोडची आवश्यकतासांगलीत वाहतुकीचा ताण वाढू लागला आहे. अवजड वाहने कोणत्याही चौकातून वळविताना मोठी कसरत होते. त्यासाठी सांगलीला रिंगरोडची गरज आहे. सध्या सांगलीच्या कृष्णा नदीवर नव्याने दोन पूल होत आहेत. या दोन पुलांप्रमाणेच रिंगरोडसाठी प्रयत्न गरजेचे आहेत. त्यासाठी केवळ महापालिकेनेच प्रयत्न करून चालणार नाहीत तर आमदार, खासदारांनीही पाठपुरावा करण्याची गरज आहे.