शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरण भरण्यास फक्त अर्ध्या ‘टीएमसी’ची गरज, पावसाने पुन्हा ओढ दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 12:18 IST

चार दिवसांपासून कडक उन्हाचे चटके

विकास शहाशिराळा : शिराळा तालुक्यात पावसाने पुन्हा ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे ९८.४९ टक्के (३३.८९ टीएमसी) भरले आहे. हे धरण भरण्यास फक्त अर्धा ‘टीएमसी’ पाण्याची गरज आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज परिसराने ५००० मिलिमीटरचा पावसाचा टप्पा पार केला आहे. या धरणात १५८५ क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे.दोन दिवस पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र चार दिवसांपासून कडक उन्हाचे चटके बसत आहेत. यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे. तालुक्यातील धरणे, तलाव भरले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र जनावरांच्या चाऱ्याचा तसेच पिकांचा प्रश्न निर्माण होणार आहे. सोयाबीनवरील किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. भात पिके पिवळी पडली आहेत.चांदोली धरण ३४.४० टीएमसी क्षमतेचे आहे. त्यापैकी ३३.८९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे फक्त ०.५१ टीएमसी पाण्याची धरण भरण्यास आवश्यकता आहे, तर २७ टीएमसी (९८.१२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज येथे ५०६२ मिलिमीटर, निवळे येथे ३७१७ मिलिमीटर, धनगरवाडा येथे २००६ मिलिमीटर, धरण परिसर १५८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे सर्वात जास्त म्हणजे ५४१२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणRainपाऊस