शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

सांगली जिल्ह्यात केवळ ६७ टक्के पेरणी, खरीप हंगामाबद्दल शेतकऱ्यांमध्ये चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 16:21 IST

शेतकरी मोठ्या पावसाकडे नजर लावून बसले आहेत.

सांगली : जुलैचा तिसरा आठवडा आला तरी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ४० टक्केच पाऊस झाला आहे. अत्यल्प पर्जन्यमानाचा परिणाम थेट खरीप पेरणीवर होऊ लागला आहे. आतापर्यंत अवघ्या ६७ टक्के क्षेत्रावरील पेरणी पूर्ण झाली आहे. तब्बल ९३ हजार ७८ हेक्टर क्षेत्रावर अद्याप पेरणी झाली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाकडे नजर लावून बसले आहेत.जिल्ह्यात खरिपाचे दोन लाख ८४ हजार ४१० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी एक लाख ९१ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. केवळ ६७ टक्के पेरणी झाली आहे. जुलै महिना संपत आला असतानाही ९३ हजार ७८ हेक्टरवर खरीप पिकांची पेरणीच झाली नाही. सोयाबीनचे सरासरी ४६ हजार ३३६ हेक्टर क्षेत्र असून, ३७ हजार ४२६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ती ८१ टक्के आहे. मूग, उडीद, मटकी, तूर आदी कडधान्यांची पेरणी ७६ टक्के झाली आहे. भात १६ हजार ६४ हेक्टर क्षेत्र असून, ८८ टक्के पेरणी झाली आहे.प्रथमच १२ टक्के क्षेत्रात पेरणीच झालेली नाही. खरीप ज्वारीची २३ टक्के, तर बाजरीची ७३ टक्के पेरणी झाली आहे. पावसाचा जोर नसल्यामुळे उर्वरित क्षेत्रावर पेरणी होणार की नाही, या चिंतेत शेतकरी आहे.

तालुकानिहाय पेरणीतालुका - पेरणी टक्केवारीमिरज ६५.९जत १०३.३खानापूर १६.२वाळवा ७४.३आटपाडी २०.८पलूस ८४.६कडेगाव ४४.३शिराळा ८४.००तासगाव ५२.०७कवठेमहांकाळ ७२.४एकूण ६७.३जिल्ह्यात १८ जुलैपर्यंत तीन वर्षांचा पाऊस (मिलीमीटरमध्ये)तालुका - २०२२ - २०२१ - २०१९वाळवा - १६८.४ - २६८.८ - १७१पलूस - १४७.१ - २७०.९  - ८३तासगाव - १०७.८ - २९२१ - २०४शिराळा - ४२८.७ - २८२.२ - ३७३मिरज - १४३.३ - २५९.७ - १७१खानापूर - १२६.९ - १२८.३ - १२२आटपाडी - ६९.४ - १३९.८ - ९३क.महांकाळ - १८२.१ - १९२.२ - ११०जत  - १०८.८ - २७०.८ - १२४कडेगाव - १७९.२ - १९६.७ - २०१

पाऊस कमी झाल्यामुळे खरीप पेरणी कमी झाली आहे. पण, सध्या पाऊस सुरू झाल्यामुळे पेरण्यांना या आठवड्यात गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. बियाणे, रासायनिक खताचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. -प्रकाश सूर्यवंशी, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी