शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर मतदारसंघात अवघी ४६ गाव

By admin | Updated: September 16, 2014 23:18 IST

इस्लामपूरची विभागणी दोन गटात : आठवेळा साखराळेत आमदारकीे

युनूस शेख- इस्लामपूर -कृष्णा आणि वारणा नदीच्या सुपीक पट्ट्यातील वसलेला सधन आणि क्रांतिकारकांचा तालुका म्हणून वाळव्याची ओळख आहे. पूर्वीचा वाळवा विधानसभा मतदारसंघ हा २००९ च्या पुनर्रचनेनंतर इस्लामपूर या नावाने पुढे आला. पुनर्रचनेनंतर वाळवा तालुक्यातील ३८ आणि मिरज तालुक्यातील आठ गावे अशा एकूण ४६ गावांचा समावेश असणारा आणि वाळवा-मिरज अशा दोन तालुक्यात इस्लामपूर मतदारसंघाची विभागणी झाली आहे.विशेष म्हणजे पुनर्रचनेत वाळवा तालुक्यातील ५२ गावे पश्चिमेकडील शिराळा मतदारसंघात गेली आहेत. त्यामुळे तालुक्याची विभागणी इस्लामपूर आणि शिराळा मतदारसंघात झाली आहे. १९६२ पासूनच्या निवडणुकीत राजारामबापू पाटील तीनदा व ग्रामविकासमंत्री जयंत पाटील पाचवेळा यांच्या रूपाने साखराळे गावाच्या नावावर आठवेळा आमदारकीची मोहोर उठली, तर विलासराव शिंदे (आष्टा, १९७८) विश्वासराव पाटील (शिगाव १९८0) आणि क्रांतिवीर पद्मभूषण डॉ. नागनाथअण्णा नायकवडी (वाळवा १९८५) यांनी प्रत्येकी एक वेळ आमदारकी पटकावली. १९७८ च्या निवडणुकीत बापू जनता पक्षातर्फे ‘नांगरधारी शेतकरी’ या चिन्हावर उभे होते. याचवेळी त्यांचेच कार्यकर्ते असणाऱ्या आष्ट्याच्या विलासराव शिंदे यांना काँग्रेसच्या ‘गाय-वासरू’ या चिन्हावर उतरवले गेले; तर डाव्या आघाडीतर्फे ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील अशी तिहेरी लढत झाली. या निवडणुकीत वसंतदादांनी विलासराव शिंदे यांना ताकद देत मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेतील प्रबळ दावेदार राजारामबापू पाटील यांचा पराभव करून खळबळ उडवून दिली होती. पुन्हा १९८० च्या निवडणुकीत जनता पक्षातर्फे शिगावचे विश्वासराव पाटील आणि काँग्रेस पक्षाचे मातब्बर नेते व प्रदेशाध्यक्ष गुलाबराव पाटील यांचा सामना झाला. या निवडणुकीतही पुन्हा वसंतदादांनी आपला करिष्मा दाखवत गुलाबराव पाटील यांना गारद केले. त्यानंतर १९८५ च्या निवडणुकीत क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी आणि विलासराव शिंदे यांच्या लढतीवेळीही वसंतदादांनी आपली सिंहाची काठी दाखवत आपल्या मतदारांना नागनाथअण्णा यांच्या निवडणुकीतील ‘सिंह’ या चिन्हाकडे वळवून राजकारणात पात बदलायची नाही, असा सूचक इशारा विलासराव शिंदे यांना देत, त्यांचा पराभव घडवून आणला. त्यानंतर १९९० मध्ये पहिली निवडणूक लढवणाऱ्या जयंत पाटील यांनी विलासराव शिंदे यांचा पराभव करीत बेरजेच्या राजकारणाला सुरुवात केली.

राजकारणातील त्यांची ही बेरीज २००९ च्या पाचव्या निवडणुकीपर्यंत सुरूच राहिली. पण जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात स्वाभिमानीच्या खासदार राजू शेट्टी यांनी दोनवेळा मुसंडी मारत इतिहास घडवला. साडेतीन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तर खा. शेट्टी यांनी जयंतरावांच्या तोंडचे पाणी पळविले होते. विधानसभेसाठी जयंत पाटील यांचा असणारा हा सर्व मतदार शेट्टींच्या पाठीशी उभा राहिला, हे कटू वास्तव ताजे असतानाच, आता विधानसभेचा फड रंगणार आहे. वाळवा तालुक्यात वसंतदादा पाटील यांना मानणारा मोठा वर्ग होता. त्याची प्रचिती तीन निवडणुकांमधील दादांच्या इशाऱ्यावरून आली. अजूनही ही धग राखेच्या कोंदणात गाडून घेतलेल्या निखाऱ्यात आहे, याचे प्रत्यंतर अपवादाने येते.जयंत पाटील यांनी विलासराव शिंदे, अशोकदादा पाटील, इस्लामपूरच्या नगरपालिका राजकारणातील कट्टर विरोधक माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आणि ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील यांनाही बरोबर घेत बेरजेचे राजकारण केले आहे.