शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

जुलैची एलबीटी वसुली केवळ १३ कोटी

By admin | Updated: August 2, 2015 00:12 IST

महापालिका : पंधरा दिवसानंतर कारवाईसाठी तयारी, थकित कराचा डोंगर प्रशासनासाठी डोकेदुखी

सांगली : महापालिकेच्या एलबीटी विभागाचे वसुलीचे दुखणे कायम असून, जुलै महिन्यात मोठ्या वसुलीची अपेक्षा ठेवलेल्या महापालिकेच्या पदरी पुन्हा निराशा आली. जुलै महिन्याची वसुली केवळ १३ कोटी ६९ लाख ११ हजार ३१८ इतकीच झाली आहे. थकबाकीसहीत महापालिकेला आणखी १२५ कोटी रुपये वसुली अपेक्षित असताना चालू वर्षाची जुलैअखेर वसुली ३२ कोटींवर गेली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील एलबीटी विभागाला मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन दिवसांत चांगली वसुली झाली असली तरी, एकूण वसुलीत महापालिकेच्या पदरी निराशा आली आहे. महापालिका क्षेत्रातील एलबीटी जुलैपासून शासनाने रद्द केली आहे. येत्या पंधरा दिवसांत वसुलीची संधी महापालिकेला आहे. त्यानंतर एलबीटी वसुलीसाठी महापालिकेच्या हाती फारसे काही राहणार नाही. जुलै महिन्यात मोठी वसुली होईल, अशी अपेक्षा महपाालिकेने बाळगली होती, मात्र केवळ साडेतेरा कोटींचा आकडाच महापालिका ओलांडू शकली. जुलै महिन्यात नव्या केवळ १९२ व्यापाऱ्यांनी एलबीटीचा भरणा केला आहे. वास्तविक हा आकडा हजारोंच्या घरात अपेक्षित होता. गेल्या तीन दिवसांत महापालिकेने चांगली वसुली केली असली तरी, थकबाकी व चालू मागणीचा विचार करता तीही वसुली कमीच आहे. एलबीटी बुडविणाऱ्या व अभय योजनेत समावेश नसलेल्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. राज्य शासनानेच अभय योजनेच्या अधिसूचनेतच एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायद्याने कारवाई करण्याची मुभा महापालिकेला दिली आहे. दुकानांची तपासणी, कागदपत्रांची छाननी, जप्तीच्या कारवाईचे अधिकार महापालिकेला आहेत. त्यामुळे त्याचीही तयारी आता प्रशासनाच्या स्तरावर सुरू झाली आहे. व्यापाऱ्यांना कर भरण्यासाठी त्यांनी शेवटचे आवाहन केले आहे. त्यानंतर कारवाईस सुरुवात होणार आहे. महापालिकेने शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्याचे पैसे केव्हा मिळणार याकडे आता प्रशासनाचे आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)