रस्त्यावरील अँटिजन तपासणीत एक जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST2021-06-27T04:18:42+5:302021-06-27T04:18:42+5:30
सांगली : सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने नागरिकांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. शनिवारी दिवसभरात १५८ जणांच्या ...

रस्त्यावरील अँटिजन तपासणीत एक जण बाधित
सांगली : सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने नागरिकांची कोरोना चाचणी सुरू केली आहे. शनिवारी दिवसभरात १५८ जणांच्या कोरोना चाचणीत एक बाधित आढळला.
विशेष सार्वजनिक आस्थापना आणि गर्दीच्या वस्त्यांमध्ये कोरोना तपासणी सुरू करण्यात आली आहे. सांगलीत मॉलमधील ग्राहक, कर्मचारी यांच्याबरोबर मिरज कुपवाड आणि संजयनगर पत्र्याची चाळमध्येही नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात एक जण बाधित आढळला.
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सार्वजनिक ठिकाणी कोरोना चाचणीचे आदेश दिले होते. उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल धनवडे यांची वैद्यकीय टीम कार्यरत होती. यावेळी सहायक आयुक्त एस. एस. खरात, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, निरीक्षक अंजली कुदळे, राजू गोंधळे आदी उपस्थित होते. संसर्ग रोखण्यासाठी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून यामुळे जे छुपे कोरोना संशयित रुग्ण आहेत, यांचा शोध घेता येणार आहे.