शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! सांगली जिल्ह्यात १९ तासानंतर जातोय एकाचा अपघाती बळी

By घनशाम नवाथे | Updated: January 14, 2025 18:24 IST

अपघाताचे प्रमाण वाढल्याने चिंता व्यक्त

घनश्याम नवाथे सांगली : जिल्ह्यात अपघात स्थळे नाहीशी केली जात असून रस्तेही मोठे झालेत. परंतु अपघातांची मालिका काही थांबतच नसल्याचे दिसून येते. गतवर्षात ९४२ गंभीर अपघात होऊन त्यामध्ये ४४९ जणांचा अपघाती मृत्यू झाला. जिल्ह्यात दर १९ तासाला एकाचा अपघाती बळी जात असल्याचे भयानक चित्र दिसून येते.जिल्ह्यात दहा वर्षांपूर्वी जवळपास ६० ते ७० ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात वारंवार अपघात होणारी ठिकाणे होती. वर्षानुवर्षे याठिकाणी धोका असल्याचे फलक दिसत होते. अखेर अपघाताची ठिकाणेच नामशेष करण्याचे आदेश आल्यानंतर ‘ब्लॅक स्पॉट’ हटवले जात आहेत. आता केवळ मोजकेच ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत.दुसरीकडे रस्तेही मोठे झालेत. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे, वेडीवाकडी वळणे, गतिरोधक, धोकादायक चढ-उतार आदीमुळे होणारे अपघात कमी झाले आहेत. बेदरकारपणा, वेगाची नशा, वाहतूक नियमांचे पालन न करणे आदीमुळे अपघात होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्याचे आव्हान उभे राहिले आहे. रस्ता सुरक्षा अभियानाच्या प्रारंभी अधिकाऱ्यांनी अपघाताचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

अपघाताचे प्रमाण वाढलेगतवर्षात ७२७ गंभीर अपघात होऊन ३४४ जणांचा बळी गेला होता. यंदाच्या वर्षात ९४२ अपघात होऊन ४४९ जणांचा अपघाती बळी गेला आहे. गतवर्षाच्या तुलनेत वाहनांची संख्या वाढली असून अपघातही वाढत आहेत.

दररोज १५० ते १७५ नवीन वाहनेवाहन संख्येचा वेग वाढतच चालला आहे. जिल्ह्यात दररोज १५० ते १७५ नवीन वाहने रस्त्यावर धावताना दिसतात. गतवर्षात नवीन ६७ हजार वाहनांची भर पडली. जिल्ह्यातील एकूण वाहन संख्या डिसेंबर २०२४ अखेर १३ लाख ८३ हजार ४७५ इतकी आहे.

अपघाताची कारणेसर्वाधिक अपघात हे अतिवेगामुळे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. निष्काळजीपणे, नागमोडी वळण घेणे. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे. नशेत वाहन चालवणे. स्वत:च्या कौशल्यावर फाजील आत्मविश्वास असणे. विना हेल्मेट दुचाकी चालवणे. मोटार चालवताना सीटबेल्ट न वापरणे ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत.

कायद्याने ठरवलेली कमाल वेगमर्यादावाहनप्रकार - एक्स्प्रेस हायवे - चौपदरी महामार्ग - महापालिका क्षेत्र इतर रस्तेआसन क्षमता ८ - १२०  - १००  -  ७०  - ७०आसन क्षमता ९ पेक्षा जास्त - १००  - ९० -  ६०  -  ६०सर्व मालवाहू वाहने - ८०  - ८०  - ६० - ६०दुचाकी -  (परवानगी नाही) - ८० - ६० -  ६०तीनचाकी वाहने -   ५०  -  ५०  - ५०

अपघात कसे टाळाल

  • दुचाकी चालवताना पुढील वाहनापासून दोन सेकंदाचे अंतर ठेवा. रात्री व पावसाळ्यात ३-४ सेकंदाचे अंतर ठेवा
  • वाहनाचा वेग वारंवार तपासा. वेग जास्त असेल तर वाहन थांबण्यास वेळ लागतो.
  • ओव्हरटेक उजव्या बाजूनेच करा.
  • वाहन नेहमी सुस्थितीतच ठेवा.
  • वाहतूक नियमांचे पालन करा.

सुरक्षा अभियान सतत हवेआरटीओ कार्यालय, पोलिस प्रशासन आणि बांधकाम विभागातर्फे जानेवारी महिन्यात रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते. पूर्वी सप्ताह होता. त्यानंतर पंधरवडा झाला. यंदा महिनाभर सुरक्षा अभियान राबवले जात आहे. परंतु अपघातांची वाढती संख्या पाहता अभियान सतत सुरू ठेवण्याची गरज भासत आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू