शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बँकेत चोरीचा प्रयत्न करणारा २४ तासांत जेरबंद, आणखी दोघांची नावे निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 15:08 IST

तासगाव अर्बनमध्ये चोरीचा प्रयत्न

सांगली : बाजार समिती आवारात तासगाव अर्बन बॅंकेत चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी एका चोरट्याला २४ तासांत जेरबंद करण्यात यश आले. ओंकार विशाल साळुंखे (वय १९, रा. राजीव गांधी झोपडपट्टी, जुना बुधगाव रस्ता, सांगली) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शिताफीने अटक केली.साळुंखे याच्याकडून सुदर्शन यादव (मूळ रा. कराड, सध्या रा. विश्रामबाग, सांगली) आणि मुनीब ऊर्फ बाबू भाटकर (रा. आंबा चौक, कुपवाड रस्ता, सांगली) या आणखी दोघा संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. या तिघांनी बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास बॅंकेत शिरून चोरीचा प्रयत्न केला होता; मात्र चोरीचा संदेश शाखा व्यवस्थापकांच्या मोबाईलवर गेल्यानंतर पोलिसांनी धाव घेतली. त्याचवेळी बँकेत सायरनही वाजू लागल्याने चोरटे पळून गेले.ते तिघेही मीरा हौसिंग सोसायटी परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यांचा शोध घेत असताना निकुंज लॉनसमोरील रस्त्यावरून ओंकार साळुंखे चालत जाताना दिसला. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले. त्याच्या झडतीमध्ये कोयता, कटावणी, चाकू, स्क्रू ड्रायव्हर अशी हत्यारे सापडली. पोलिसांनी त्याला अटक केली असून, अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. त्यांच्याविरोधात बॅंकेचे व्यवस्थापक अश्विनीकुमार वसंत बिरनाळे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली.

तिघेही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा तपास निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, अनिल कोळेकर, विक्रम खोत, संदीप गुरव, नागेश खरात, दऱ्याप्पा बंडगर, अनिल कोळेकर, सतीश माने, सागर लवटे, सागर टिंगरे, अमर नरळे, सुशील मस्के, संदीप नलावडे, सूरज थोरात, सुमित सूर्यवशी, कॅप्टन गुंडवाडे, आदींनी केला.

आणखी एक घर फोडलेदरम्यान, अर्बन बँकेत सायरन वाजल्याने तेथून पळ काढलेल्या तिघांनी दुसऱ्या ठिकाणी चोरी केली. मल्टिप्लेक्स चित्रपटगृहाच्या पीछाडीस कॉलनीत घर फोडून चांदीचे साहित्य लंपास केले. तशी कबुली त्यांनी दिली आहे.

टॅग्स :SangliसांगलीbankबँकtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस