Sangli Crime: क्रिप्टोकरन्सी प्रकरणातील एकास अटक, कोट्यवधींची फसवणूक; संशयित दाम्पत्य अद्याप पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 05:47 PM2023-01-31T17:47:36+5:302023-01-31T17:48:06+5:30

क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून तीन महिन्यांत दुप्पट रक्कम देण्याचे दिले होते आमिष

One of Sangli arrested in cryptocurrency case, Suspicious couple still spread | Sangli Crime: क्रिप्टोकरन्सी प्रकरणातील एकास अटक, कोट्यवधींची फसवणूक; संशयित दाम्पत्य अद्याप पसार

Sangli Crime: क्रिप्टोकरन्सी प्रकरणातील एकास अटक, कोट्यवधींची फसवणूक; संशयित दाम्पत्य अद्याप पसार

googlenewsNext

सांगली : आर्थिक गुन्हे शाखेने क्रिप्टोकरन्सी फसवणूकप्रकरणी एका संशयिताला अटक केली. अब्दुल महंमदसाब इनामदार (छलवादे गल्ली, गुरुवार पेठ, मिरज) असे त्याचे नाव आहे. संशयितास मंगळवार ३१ रोजी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. इब्राहिम महंमदसाब इनामदार, त्याची पत्नी जस्मीन इब्राहिम इनामदार तीन महिन्यांपासून अद्याप पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.

फिर्यादी सादिक यासीन कोचरगी (शहापूर, इचलकरंजी) यांचा यंत्रमाग व्यवसाय आहे. शेजारील लतीफ मुल्ला, त्यांचा मुलगा ओसामा यांची ओळख होती. जानेवारी २०२२ मध्ये संशयित जस्मीन इनामदार, डॉ. इब्राहिम इनामदार व अब्दुल इनामदार यांच्याशी मुल्लांनी ओळख करून दिली. संशयितांनी कोचरगी यांना क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून तीन महिन्यांत दुप्पट रक्कम देतो, असे सांगितले.

त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी कोचरगी यांनी बारा लाख, तर नईम जंगले यांचे १३ लाख, बंदेनवाज मुजावर यांचे १४ लाख, संभाजी जाधव यांचे २२ लाख अशी एकत्रित ६१ लाखांची गुंतवणूक केली. फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी संशयितांच्या घरावर छापे टाकले, आलिशान गाडी जप्त केली. काही महत्त्वाची कागदपत्रे व रोकडही जप्त केली. आता त्यांची बँक खाती गोठवण्यात आलीत. अन्य मालमत्तांचा शोधही घेतला जात आहे.

दरम्यान, लतीफ मुल्ला यांच्यासह आणखी तिघांचे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्याची पडताळणी करून ते दाखल करण्यात आले. कोट्यवधींची फसवणूक झाल्याची तक्रार तिघांनी नोंदवली आहे. त्यानंतर सोमवारी एकास अटक करण्यात आली. क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणूक झालेल्यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांनी केले आहे.

Web Title: One of Sangli arrested in cryptocurrency case, Suspicious couple still spread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.