शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: थकीत पगार बिलासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी, मिरजेत शिक्षक अन् लिपिकाला अटक

By घनशाम नवाथे | Updated: December 30, 2024 19:32 IST

सांगली : महाविद्यालयातील थकीत पगार बिलाची १९ लाखांची रक्कम मंजूर करून आणण्यासाठी सहा टक्के याप्रमाणे १ लाख १० हजार ...

सांगली : महाविद्यालयातील थकीत पगार बिलाची १९ लाखांची रक्कम मंजूर करून आणण्यासाठी सहा टक्के याप्रमाणे १ लाख १० हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी मिरजेतील हिंद एज्युकेशन सोसायटीचा शिक्षक उमेश मारुती बोरकर, (वय ३६, रा. यादव गल्ली, कवठे एकंद, ता. मिरज) व कनिष्ठ लिपिक युवराज मनोहर कांबळे (वय ५६, रा. बौद्ध वसाहत, बेडग, ता. मिरज) याला अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. दोघांवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.अधिक माहिती अशी, तक्रारदार यांची पत्नी सांगलीतील दोन महाविद्यालयांत संस्कृत विषय शिकविण्यासाठी अर्धवेळ शिक्षिका म्हणून काम करत होत्या. दोन्ही आस्थापनांकडील सुमारे दोन वर्षांचे एकूण १९ लाख ४५ हजार ७१० रुपये येणे बाकी होती. एकूण तीन पगार बिले दोन्ही कॉलेज प्रशासनाने मंजुरीसाठी जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील पे युनिट कार्यालयाकडे पाठवली होती. तक्रारदार यांच्या पत्नी या थकीत बिलासाठी पाठपुरावा करत असताना उमेश बोरकर याने सहा टक्के लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी दि. १४ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार अर्ज दिला. तक्रारीनुसार दि. २८ नोव्हेंबर रोजी पडताळणी केली.हिंद एज्युकेशन सोसायटीचा नरवाड येथील शिक्षक उमेश बोरकर याने थकीत बिलाची रक्कम अधीक्षक करमुसे व लिपिक मंडले यांना सांगून मंजूर करून आणतो, असे सांगितले. त्यासाठी थकीत बिलाच्या सहा टक्केप्रमाणे १ लाख १० हजार रुपये लाचेची मागणी केली. तर हिंद एज्युकेशनच्या न्यू इंग्लिश स्कूल सोनी येथील कनिष्ठ लिपिक युवराज कांबळे याने या लाचेच्या मागणीवेळी उपस्थित राहून तक्रारदार यांनी लाच द्यावी म्हणून प्रोत्साहन दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.उमेश बोरकर व युवराज कांबळे यांनी १ लाख १० हजारांची लाच मागितली. परंतु, लाच स्वीकारली नव्हती. त्यामुळे लाचेच्या मागणीबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवला. तेथून परवानगी मिळाल्यानंतर बोरकर व कांबळे याला अटक करून विश्रामबाग पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला.पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक किशोर खाडे, पोलिस अंमलदार सीमा माने, प्रीतम चौगुले, अजित पाटील, धनंजय खाडे, पोपट पाटील, सलीम मकानदार, अतुल मोरे, उमेश जाधव, चंद्रकांत जाधव, विठ्ठल रजपूत यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :SangliसांगलीBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग