हाकेच्या अंतरावर घर अन् काळाचा घाला; ट्रकने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 12:42 PM2021-09-19T12:42:01+5:302021-09-19T12:42:40+5:30

ट्रकला ठोस देत ब्राह्मणपुरी येथील एकाचा मृत्यू

One died on the spot after being hit by a truck in sangli | हाकेच्या अंतरावर घर अन् काळाचा घाला; ट्रकने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू

हाकेच्या अंतरावर घर अन् काळाचा घाला; ट्रकने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू

Next

ब्राह्मणपुरी- शहादा तालुक्यातील शहादा-खेतीया रस्त्यावरील ब्राह्मणपुरी नजीक असलेल्या पेट्रोल पंप समोर रस्त्याचा कडेला उभे असलेल्या गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रक मोटार सायकलने धडक दिल्याने मोटार सायकल स्वार यांच्या जागीच ठार झाल्याची घटना दि.१८ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. 

साहेबराव दौलत पाटील  वय ५४ रा.ब्राह्मणपुरी असे मयताचे नाव आहे लोणखेडा हुन चांदसैली ओंडालून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर असलेल्या आपल्या ब्राह्मणपुरी गावी मोटार सायकल क्रमांक एम.३९पी.१००२ ने येत असताना पेट्रोल पंप समोर रस्त्यावर बेजबाबदार पणे गॅस सिलेंडर चा बाटला ने भरून उभी असलेली ट्रक क्रमाक्र एम.पी.०९ एच.एच.१०२४ ला मागून जोरदार धडक दिल्याने साहेबराव दौलत पाटील हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती कुटूंबियांना ,नातेवाईकांना मिळताच त्यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतली.मृत्य देहाचा शवविच्छेदन म्हसावद ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

Web Title: One died on the spot after being hit by a truck in sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app