शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेअर मार्केटव्दारे सव्वा कोटींचा गंडा घालून झाला होता पसार, सांगली पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 17:45 IST

शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले

सांगली : शेअर मार्केटच्या माध्यमातून कमी कालावधीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून आटपाडी परिसरातील गुंतवणूकदारांना एक कोटी २७ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या संशयितास पोलिसांनी जेरबंद केले. संतोष धोंडिराम ढेमरे (वय ३९, रा.आटपाडी ) असे संशयिताचे नाव आहे. त्याने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने व्हीएचएस ट्रेडर्स एलएलपी या कंपनीच्या माध्यमातून अनेकांची आर्थिक फसवणूक केली होती. गंडा घालून पसार झालेल्या ढेमरे याच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या.या कंपनीच्या माध्यमातून आटपाडी परिसरातील गुंतवणूकदारांची फसवणूक होताच संतोष ढेमरेसह संदीप धोंडिराम ढेमरे, विनोद दादासाहेब कदम, हारुण इस्माईल तांबोळी (रा. सर्व आटपाडी) यांच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संतोष ढेमरे हा पसार होता.

दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकास संशयित संतोष हा पुणे येथील बिबवेवाडी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तिथे जात अटक केली. संशयित संतोष ढेमरे यास न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला १२ एप्रिलपर्यत पोलिस कोठडी सुनावली.फसवणूक झाल्यास संपर्क कराव्हीएचएस कंपनीच्या माध्यमातून अजूनही कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल करावी. शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जादा परताव्याच्या आमिषाला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसshare marketशेअर बाजार