Sangli: व्यापाऱ्याजवळील रोकड हातचलाखीने लांबविणारा अटकेत, कवठेमहांकाळ येथील घटना
By शरद जाधव | Updated: October 18, 2023 19:09 IST2023-10-18T19:08:58+5:302023-10-18T19:09:15+5:30
सांगली : कवठेमहांकाळ शहरातील किराणा दुकानदाराच्या गल्ल्यातील पैशांवर हातचलाखीने डल्ला मारणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. इम्रानआली यावरअली ...

Sangli: व्यापाऱ्याजवळील रोकड हातचलाखीने लांबविणारा अटकेत, कवठेमहांकाळ येथील घटना
सांगली : कवठेमहांकाळ शहरातील किराणा दुकानदाराच्या गल्ल्यातील पैशांवर हातचलाखीने डल्ला मारणाऱ्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. इम्रानआली यावरअली बेग (वय २७, रा. कुडची जि. बेळगाव) असे संशयिताचे नावे आहे. त्याच्याकडून दुचाकी आणि रोकड असा ८४ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.
कवठेमहांकाळ शहरातील अनिल दिगंबर सगरे यांचे ओढापात्रानजीक किराणा दुकान आहे. २७ सप्टेंबर रोजी संशयित बेग आणि त्याचा मेहूणा अबरार कोलामो बेग (रा. बरणपूर, मध्यप्रदेश) यांनी हातचलाखी करत सगरे यांच्या दुकानातील गल्ल्यातून ३६ हजार रुपयांची रोकड लांबविली होती. यातील ३४ हजार रुपये बेगजवळ आढळून आले.
जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील संशयितांवर कारवाईसाठी एलसीबीने तयार केलेले पथक सांगली शहरात गस्तीवर असताना, त्यांना ही माहिती मिळाली की, संशयित बेग हा सांगलीवाडी येथील टोलनाक्याजवळ थांबला आहे. त्यानुसार पथकाने तिथे जात ही कारवाई केली.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, अरूण पाटील, सुनिल जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली.