शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने विसर्ग सुरु, कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ; महापुराची धास्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 14:30 IST

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने दिलासा

सांगली : सांगली, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले आहे. नद्यां-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने सांगलीसह कोल्हापूरला पूरस्थिती गंभीर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.कर्नाटकातील अलमट्टी धरणातून सव्वा लाख क्युसेकने विसर्ग सुरु होता. आज, बुधवारी सकाळी १० वाजता अलमट्टी धरण प्रशासनाने तो वाढवत आता दीड लाखावर नेला आहे. याबाबतचा अॅलर्ट त्यांनी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागास दिला आहे.कृष्णेची पाणीपातळी नऊ फुटाने वाढलीशिराळा तालुक्यासह कोयना, वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. शिराळा तालुक्यात ७० मिलिमीटर, तर वारणा (चांदोली) धरण क्षेत्रात १३० आणि कोयना धरण क्षेत्रात १७५ मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. वारणा धरणातून ५६२८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे वारणा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली गेले असून कृष्णा दुथडी भरून वाहत आहे.काल, मंगळवारी दिवसभरात वारणा धरण क्षेत्रात ३७, तर कोयना धरण क्षेत्रात ९२ मिलिमीटर पाऊस झाला. वारणा धरणात ३०.५३ टीएमसी पाणीसाठा असून ८९ टक्के धरण भरले आहे. यामुळे धरणातून पाच हजार ६२८ क्युसेकने विसर्ग होत आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार आहे. कोयना धरण ७२ टक्के भरले आहे.

दोन लाख क्युसेकने विसर्ग सोडासांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. कोयना, वारणा, राधानगरी धरणांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. यामुळे अलमट्टी धरणातून दोन लाख क्युसेकने सध्या विसर्ग केला तरच कृष्णा, वारणा, पंचगंगा नद्यांचा महापूर टाळता येणार आहे. यासाठी कर्नाटक सरकारवर दबाव टाकण्याची गरज आहे, अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.वारणा नदीकाठी महापुराची धास्तीसंततधार पावसामुळे वारणा नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी शेतांमध्ये शिरले असून वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द येथील नदीकाठावरील लोकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना ग्रामपंचायतीने देण्यात आलेल्या आहेत.गतवर्षी २३ जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधित वारणा नदीला महापूर आला होता.  गतवर्षीच्या महापुरातून अद्याप अनेकजण सावरलेले नसताना आता पुन्हा  वारणेला पूर आल्याने नदीकाठावरील शेतकरी, ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने वारणा नदीला पूर आलेला आहे. मांगले, चिकुर्डे, कुंडलवाडीदरम्यान असणारे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाणी शेतीमध्ये शिरले आहे.चिकुर्डेत पुलावर पाणीवाळवा तालुक्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस तसेच चांदाेली धरणातून पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने चिकुर्डे परिसरात वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. चिकुर्डे ते वारणानगर जुना पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसDamधरण