शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

सावधान! सांगली कारागृहाच्या तटबंदीवरील तारांमध्ये विजेचा प्रवाह, स्पर्श करताच वाजणार ‘अलार्म’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 12:29 IST

कैद्याने पलायनाचा प्रयत्न केल्यास ‘करंट’ लागू शकतो

घनशाम नवाथेसांगली : ब्रिटिशकालीन जिल्हा कारागृहाच्या तटबंदीवरून गतवर्षी आणि नुकतेच कैदी पळाल्याचा प्रकार घडला. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली. आता शेवटचा उपाय म्हणून तटबंदीवर उभारलेल्या सहा फुटांच्या तारेच्या ‘वाय’ आकारातील कम्पाउंडच्या तारांमधून विजेचा प्रवाह खेळता ठेवला आहे. त्यामुळे कैद्याने पलायनाचा प्रयत्न केल्यास ‘करंट’ लागू शकतो. तसेच तत्काळ ‘अलार्म सिस्टीम’मधून भोंगाही वाजू लागेल.गतवर्षी जुलै २०२२ मध्ये तासगावच्या खुनातील संशयित सुनील ज्ञानेश्वर राठोड (रा. यळगूड, ता. सिंदगी) हा तटबंदीवरून उडी मारून पळाला, तर गत महिन्यात ‘पोक्सो’च्या गुन्ह्यातील सदाशिव अशोक सनदे (२५, मिसाळवाडी, आष्टा) हा पटवर्धन हायस्कूलच्या बाजूने पळाला. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा धोक्यात असल्याचा इशारा मिळाला. या घटनेपूर्वी गांजा, दारू, मोबाइल तटबंदीवरून आतमध्ये टाकण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

कारागृहाभोवती गेल्या काही वर्षात शाळा, अपार्टमेंट व नागरी वस्ती झाली आहे. नागरिकांच्या घरावर चढून आतमध्ये मटणाची पाकिटे टाकल्याचा प्रकारही पूर्वी घडला होता. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. तटबंदीवर जवळपास सहा फुटांचे तारेचे कम्पाउंड असून, त्यामध्ये विजेचा प्रवाह सोडला आहे तसेच आतमध्ये धोक्याच्या ठिकाणी पत्रे मारले आहेत.

कैदी क्षमता २३५ सध्या ४००सांगलीच्या कारागृहात पुरुष कैद्यांची क्षमता २०५, तर स्त्रियांची क्षमता ३० इतकी आहे. २३५ क्षमतेच्या कारागृहात सद्य:स्थितीत ४०० कैदी आहेत. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे कारागृह प्रशासनावर ताण येतो. जिल्ह्यातील इतर १०० हून अधिक कैदी कळंबा कारागृहात आहेत.

खुनातील १९६ संशयितजिल्हा कारागृहात एक वर्षाच्या आतील शिक्षा लागलेल्या कैद्यांना ठेवले जाते, तसेच गंभीर गुन्ह्यात जामीन न झालेले कच्चे कैदीही येथे ठेवले जातात. खुनाचा आरोप असलेले १९६ संशयित सध्या कारागृहात आहेत. त्यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.

कारागृहातील बंदींची संख्या पाहता मनुष्यबळ अपुरे पडते. कैदी पलायनाचे तसेच इतर गैरप्रकार घडू नयेत म्हणून तटबंदीच्या वरती उभारलेल्या तारेच्या कम्पाउंडमधून विजेचा प्रवाह खेळता ठेवला आहे. -विवेक झेंडे, कारागृह अधीक्षक, सांगली

टॅग्स :Sangliसांगलीjailतुरुंग